मृतदेहाला ‘मुंग्या’ लागल्या पण कोणीही धजावलं नाही अंत्यविधीसाठी, मराठवाड्यातील धक्कादायक घटना

मुंबई, वृत्तसंस्था – एचआयव्ही बाधित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर निर्दयी शेजाऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याला नकार दिला. या मृतदेहाला मुंगळे लागले होते पण कोणीही अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आले नाही. शेवटी पाली येथील इंन्फट इंडिया संस्थेच्या परिसरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीडमध्ये रविवारी (ता.११) ही घटना घडली. मुलाच्या आईला काही वर्षापुर्वी पतीने सोडून दिले होते.

मोलमजुरी करुन ती स्वतःचा आणि तिच्या मुलांचा सांभाळ करत होती. दरम्यान तिला एचआयव्हीची लागण झाली. त्यानंतर तिच्या दोन्ही मुलांनाही ही लागण झाली. त्यातच वर्षभरापुर्वी तिच्या मुलीचा मृत्यू झाला होता. पंधरा दिवसांपुर्वी मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलावर अत्यसंस्कार करण्यासाठी महिलेने गावातील शेजाऱ्यांना विणवले. मात्र निर्दयी शेजाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले नाहीत. निराशा पदरी पडल्याने तिने रिक्षाने मुलाचा मृतदेह पाली येथील इंन्फट इंडिया संस्थेत नेला. संस्थेचे दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी संस्थेच्या “वेदना” स्मशानभुमीत मुलाचे अंत्यसंस्कार केले. एचआयव्ही ची लागण झाल्याचे कळताच महिलेच्या नातेवाईकांनी ही तिला दूर केले. त्यातच परिसरातील नागरिकांकडूनही तिला अपमानास्पद वागणूक मिळत होती.

आरोग्यविषयक वृत्त –