इंदोरी येथील वसतीगृहाच्या मुलावर ‘लैगिक’ अत्याचार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इंदोरी येथील वसतीगृहात राहणाऱ्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या  वसतीगृहाच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. जगन्नाथ रामभक्त हिंगे (वय ६५, रा. इंदोरी, ता. मावळ) असे त्याचे नाव आहे.

जगन्नाथ हिंगे याच्या मालकीचे वसतीगृह आहे. या वसतीगृहात राहणाऱ्या  एका मुलाने याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना जुलै ते ऑगस्ट २०१९ दरम्यान घडली होती. हिंगे याने या मुलाला पाण्याची बाटली घेऊन तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये बोलावले. रुमचा दरवाजा बंद करुन हिंगे याने मुलाची चड्डी काढून त्याच्यावर लैगिंक अत्याचार केले. पोलीस अधिक तपास करीत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like