धक्कादायक ! जेवण दिलं नाही म्हणून मुलानं जन्मदात्या आईवर झाडल्या गोळया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एक खळबळजन घटना घडली असून केवळ आईने जेवण दिले नाही म्हणून मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा गोळ्या झाडून खून केला. नशेत असलेल्या मुलाने आईकडे जेवण मागितले. मात्र, आईने त्याला जेवण देण्यास नकार देत ति त्याला रागावली. याचा राग मुलाला आल्याने त्याने कोणताही विचार न करता थेट आईवर गोळ्या झाडल्या.

पोलिसांनी आरोपी मुलगा सूरज (वय-26) याला अटक केली आहे. सूरज याला दारूचे व्यसन असून तो दररोज दारू पिऊन रात्री उशिरा घरी येत होता. त्यामुळे त्याची आई बालादेवी (वय-60) त्याला व्यसन सोडण्याविषयी सांगत होती. सूरजने दारू पिलेली तिला आवडत नव्हते. त्यावरून आरोपी आईशी नेहमी भांडत होता. गुरुवारी रात्री मुलगा घरी आला. त्याने जेवण मागितले. आईने त्याला पुन्हा व्यसनाबाबत रोखले असता मुलाने खोलीत ठेवलेला कट्टा बाहेर आणला आणि आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. यामध्ये गंभीर जखमी होऊन आईचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालादेवी आपल्या कुटुंबासह बवाना गावात रहात होती. कुटुंबात दोन मुली व तीन मुलगे आहेत. बालादेवी यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. दोन मोठी मुलगे चित्रकार आहेत, तर सूरज चालक आहे. सूरज दारू पिऊन उशीरा घरी येत होता. आईला याचा राग येत होता. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास आरोपी सुरज दारूच्या नशेत घरी आला. त्यामुळे संतापलेल्या आईमध्ये आणि सरुजमध्ये दारूवरून भंडण झाले. सुरजने खोलीतून कट्टा आणून आईच्या डोळ्यात गोळी झाली. तिला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र बालादेवी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

पोलिसांनी आरोपी सूरजला अटक करून त्याच्याकडून कट्टा जप्त केला आहे. शुक्रवारी पोलिसांनी बालादेवी यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. सूरजने हा कट्टा कुठून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत. या संदर्भात पोलीस आरोपी सूरजकडे सखोल चौकशी करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like