Health Tips : मुलांना ‘या’ 3 कारणांमुळे होऊ शकतो टायफाईड, बचावासाठी अवलंबा ‘या’ पद्धती

टायफाईड एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. यास साल्मोनेला एन्ट्रिका आणि सेरोटाईप टायफी नावाचे दोन बॅक्टेरिया पसरवतात. टायफाईड शरीरात शिरल्यानंतर अनेक अवयवांना प्रभावित करतो. संसर्गामुळे होणारा हा आजार घाणीमुळे किंवा घाणेरड्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होतो. टायफाईड रोग स्पर्श केल्याने पसरत नाही. हा आजार कोणत्या वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. यापासून आपला बचाव कसा करायचा यासंबंधी जाणून घेवूयात…

मुलांमध्ये पसरण्याचे कारणे

1. दूषित अन्नामुळे मुलांमध्ये हा रोग पसरतो. टायफी बॅक्टीरियाने संक्रमित वस्त मुलांनी सेवन केली तर टायफाईड होण्याचा धोका वाढता.

2. दूषित पाण्या प्यायल्यामुळे टायफाईड होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात फिल्टर न केलेले किंवा न उकळलेले पाणी थेट प्यायल्याने हा धोका असतो.

3. जर एखाद्या मुलाला टायफाईड झाला असेल आणि त्याच्या संपर्कात एखादा व्यक्ती आल्यास त्याला सुद्धा टायफाईड होण्याचा धोका वाढतो. कारण हा संसर्गजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीचे खोकणे, शिंकणे, त्याचे उष्टे खाण्याने हा आजार होऊ शकतो.

ही आहेत मुलांमधील लक्षणे

मुलांमध्ये टायफाइडची लक्षणे 1 ते 2 आठवडे आधी दिसू लागतात. ही लक्षणे हलकी आणि गंभीर दोन्ही असू शकतात.

– 100.4 डिग्री फॅनहाईट ताप असणे.
– भूख कमी लागणे.
– डोक्यात आणि पोटात दुखणे.
– थकवा आणि कमजोरी जाणवणे.
– खोकला आणि गळ्यात खवखव.
– डायरिया, इत्यादी.

लक्षणे आढळल्यास हे करा

लक्षणे आढळल्यास उशीर न करता डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टर औषधासोबतच ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट आणि इंजेक्शन देतील. टायफाईडमध्ये या वस्तू फायदेशीर ठरतील.

1. मुलांना जास्तीत जास्त द्रव पदार्थ द्या. डॉक्टर ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) सुद्धा देतात. यामुळे मुलाच्या शरीरात पाण्याची कतरता होत नाही.

2. मुलांना अजिबात बाहेर जाऊ देऊ नका. जास्तीत जास्त आराम करू द्या.

3. टायफाईडमध्ये जास्त ताप असल्याने मुले अंघोळ करत नाहीत. परंतु या आजारात स्वच्छता ठेवणे खुप जरूरी आहे. यासाठी त्यांना स्पंज बाथ करा.