Children Care in Winter | हिवाळ्यात मुलांना घेरतात ‘हे’ 10 आजार, ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची मुलं पडणार नाहीत आजारी; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Children Care in Winter | हिवाळ्यात काही आजारांचा धोका जास्त असतो. यातील काही आजार असे असतात, जे तुम्हाला थेट रुग्णालयात नेऊ शकतात. या ऋतूमध्ये विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. (Children Care in Winter) कारण जसजसा हिवाळा वाढत जातो तसतशी लहान मुलांना फ्लू आणि न्यूमोनिया (Pneumonia) ची तक्रार होऊ लागते.

 

हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्याचा प्रभाव अनेक मुलांमध्ये दीर्घकाळ टिकून राहतो. अशा स्थितीत त्यांना वाढत्या थंडीपासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. मुलांना ताप, खोकला, सर्दीची तक्रार असेल लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे.

 

हिवाळ्यातील मुलांचे सामान्य आजार (Common diseases of children in winter)

सांधेदुखी (Joint pain)

सर्दी आणी ताप (Cold and fever)

सर्दी आणि खोकला (Cold and cough)

नाक बंद

शिंका येणे (Sneezing)

डोकेदुखी (Headache)

अंगदुखी (Body Pain)

वायरल फिवर (Viral fever)

घशाला सूज (Throat swelling)

कानाचा संसर्ग (Ear infection)

हिवाळ्यात अशी घ्या मुलांची काळजी (Take care of children like this in winter season)

मुलांना व्यवस्थित कपडे घाला.

मुलाचे डोके आणि कान नेहमी झाकून ठेवा.

झोपताना मुलांना ब्लँकेटने अशा प्रकारे कव्हर करा की ते संपूर्ण रात्रभर झाकलेले राहील.

थंडी जास्त असलेल्या ठिकाणी मुलांना अजिबात नेऊ नका.

खिडकी किंवा दरवाजाजवळच्या खोलीत मुलाला कधीही ठेवू नका.

खूप थंडी असताना घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.

मुलांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करा.

मुलांना रोज 1 अंडे द्या.

मुलांना रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध द्या.

 

मुलांचे थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक 

बालरोगतज्ञांनुसार, कमी तापमान (Temperature) मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, कारण त्यांच्या शरीरासाठी तापमान कायम राखणे कठीण आहे. अशा स्थितीत मुलांना थंडीपासून वाचवणे गरजेचे आहे.

 

Web Title :- Children Care in Winter | children care in winter important measures to protect children from cold

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात लाकडाचे तुकडे रस्त्यावर पडल्याने अपघात, मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीवर FIR

Dilip Walse Patil | 5 DCP आणि 5 ACP पदावर असणार्‍या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस – गृहमंत्री वळसे-पाटील

Bigg Boss 15 | फायनल टास्कने करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्यात आणला दुरावा, करण म्हणाला – ‘तु् कॅमेरासाठी….’