ये बात ! दिल्लीच्या NCR मध्ये मुलं खेळता-खेळता शिकणार विमान उडवायला, तासाला खर्च फक्त 650 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्लोबल एजूटेनमेंट थीम पार्क किडजेनिया आणि टर्किश एयरलाईन्स यांच्यात आज एक नवीन करार झाला आहे. हा करार झाल्यामुळे आता दिल्ली आणि एनसीआरमधील मुले KidZania सेंटरमध्ये विमान उडवण्यासंबंधी शिक्षण आणि त्या संबंधातील महत्वाची माहिती शिकू शकणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क घेण्यात येणार असून दररोज एका विद्यार्थ्याकडून यासाठी केवळ ६५० रुपये आकारण्यात येणार आहेत.

या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
KidZania हे एक प्रकारचे थीमपार्क असून याठिकाणी ४ वर्षांपासून ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना या थीमपार्क मध्ये प्रवेश मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक मुलाला प्रात्यक्षिक करून दाखवले जाणार असून यामध्ये प्रात्यक्षिकांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये मुलांना विमान उडवण्यापासून कार, थिएटर त्याचबरोबर हॉस्पिटलमधील उपकरणांविषयी देखील माहिती देण्यात येणार आहे. यामुळे मुलांना भविष्यात कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी याची मदत होऊ शकते.

दरम्यान, या सेंटरमध्ये तुम्ही सिंगल किंवा ग्रुपमध्ये प्रवेश घेऊ शकता. त्याचबरोबर किडजेनियाचे सध्या जगभरात २७ केंद्र असून भारतात देखील सध्या याचे नोएडा आणि मुंबईमध्ये दोन सेंटर आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like