मुस्लिम बालकांनी वाचवला गाईच्या वासराचा जीव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बालमनातील विचार हे संवेदनाक्षम असतात. पाण्याची गरज असलेल्या वासराला पाणी पाजून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न कसा केला याचे मूर्तिमंत उदाहरण आज कळंब शहरात मध्ये मकर संक्रांतीच्या पुर्व संध्येला दिसून आले.

शहरातील भाजी मार्केट आगर असलेल्या मरकस मस्जिद मधून सायंकाळी काही मुस्लिम बालक कुरान शरीफ पोथीचे पठण करून घराकडे निघाले असता वाटेत त्यांना एक गाईचे वासरू व्याकूळ अवस्थेत तडफडताना दिसून आले. लागलीच ती बालके त्याची तृष्णा भागवून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. त्यातील जवळपास सर्व बालकांनी त्या तडफडत असलेल्या वासराला पाणी पाजून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

एकीकडे गोहत्या बंदी, त्यासंदर्भात होणारे आंदोलनं असे संवेदनशील विषय देशभरात चालत असताना माणुसकी काय असते हे या लहान मुस्लीम बालकांनी जगाला दाखवून दिले आहे . त्या ठिकाणी उपस्थित असलेले जवळपास दहा ते अकरा बालक त्या तडफडत असलेल्या वासराला पाणी पाजत असल्याचे पाहून मकर संक्रांतीच्या सणाच्या पुर्वसंध्येला आलेल्या महिला पाहून थक्क झाल्या आणि त्या बालकांचे कौतुक करायला लागल्या.

पाणी पाजणाऱ्या बालके सफा रियाज शेख, अलिजा रफीक शेख, हुजेफा रफीक शेख, अरमान रफीक शेख, फिकदोस इस्माईल शेख, आयेशा इस्माईल शेख, अफरोज इस्माईल शेख, शोहेई बागवान, सईद इसाक शेख, नवाज सद्दाम पठाण व जैद यासीन यांनी मानवतेचा एक संदेश दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like