धक्कादायक ! ‘कोरोना’पासून वाचवण्यासाठी लहान मुलांना पाजली चक्क गावठी दारू, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनापासून वाचवण्यासाठी ओडिशामधील एक गावात चक्क लहान मुलांना दारू पाजण्यात आली. या सगळ्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

गावठी दारू सालापाच्या झाडाच्या तयार केलेली आहे. येथील आदिवासी भागातील लोक नशेसाठी या दारूचा वापर करतात, मात्र गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, यात काही औषधी गुणही आहेत. ओडिशामधील मलकांगिरी जिल्ह्यातील पारसनपाली या गावात एका लग्न कार्यक्रमात 10-12 वर्षांच्या मुलांना ही गावठी दारू पाझण्यात आली.

मलकांगिरी जिल्ह्यातील लोक सलापाच्या झाडापासून तयार केलेली दारू रोज पितात. मात्र ही दारू लहान मुलांना दिली जात नव्हती. कोरोनाच्या संकटात  मुलांना या व्हायरसपासून वाचवण्यासाठी आता दारूही दिली जात आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून मुलांना एका पंगतीत खाली बसून ग्लासात दारू दिली जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन लोकांना कोरोनाबाबत माहिती देत नसल्याचे समोर आले आहे.