CoronaVaccine : आता केवळ ज्येष्ठांना दिली जाणार ‘कोरोना’ लस, मुलांना करावी लागणार मोठी प्रतिक्षा

नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान आता व्हॅक्सीनबाबत सुद्धा चर्चा जोर पकडत आहे. अनेक व्हॅक्सीन कंपन्यांना व्हॅक्सीनच्या वापरासाठी आपत्कालीन मंजूरी सुद्धा मिळाली आहे. एका अंदाजानुसार पुढील वर्षाच्या सुरूवातीला कोरोना व्हॅक्सीन सामान्य लोकांसाठी उपलब्ध होईल. अशावेळी या वर्षाच्या अखेरपर्यंत ज्येष्ठांना कोरोना व्हॅक्सीन दिलेली असेल, पण मुलांना अजूनही व्हॅक्सीनसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मुलांमध्ये व्हॅक्सीनसाठी उशीराचे सर्वात मोठे कारण हे आहे की, त्यांना व्हॅक्सीनच्या ट्रायलमध्ये सहभागी करण्यात आलेले नव्हते. यामुळे व्हॅक्सीन मुलांसाठी किती सुरक्षित आहे, याबाबत औषध कंपन्यांकडे सुद्धा अद्याप माहिती नाही. औषध कंपन्या कोरोना व्हॅक्सीन बाजारात आल्यानंतर मुलांसाठी सुद्धा ट्रायल सुरू करतील. मात्र, ब्रिटनच्या फायजर-बायोएनटेकची व्हॅक्सीनला या पर्यायासह परवानगी देण्यात आली आहे की, आत्कालीन स्थितीत मुलांचे सुद्धा लसीकरण केले जाऊ शकते.

अमेरिकेत एमोरी व्हॅक्सीन सेंटरचे संचालक डॉ. रफी अहमद यांनी म्हटले की, सध्या आम्ही व्हॅक्सीनमध्ये मुलांना सहभागी करणार नाही. याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, मुलांना अजूनपर्यंत ट्रायलमध्ये सहभागी केलेले नाही. आम्हाला हे सुद्धा माहित नाही की, जी व्हॅक्सीन तयार करण्यात आली आहे, ती मुलांसाठी किती सुरक्षित आहे. औषध कंपन्यांपैकी काहींनी मुलांवर वेगळी ट्रायल सुरू करण्याची योजना आखली आहे.

व्हॅक्सीन उत्पादक कंपनी फायजर आणि मॉडर्नाने काही दिवसांपूर्वी मुलांवर सुद्धा व्हॅक्सीनची क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. मुलांवर केली जाणारी ट्रायल प्रौढांपेक्षा खुप वेगळी आणि कठिण असते. या ट्रायल अंतर्गत औषध कंपन्यांना मोठा सुरक्षा कालावधी, योग्य सुरक्षा मापदंड आणि व्हॅक्सीनच्या दोन ट्रायलमधील अंतराची योग्य पद्धतीने तपासणी करावी लागते. जेणेकरून मुलांवर व्हॅक्सीनच्या चांगल्या परिणामांचा प्रयोग करता येईल. या प्रक्रियेसाठी अंदाजे एक वर्ष लागू शकते.