तिसर्‍या लाटेपूर्वी खुशखबर ! देशात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी जास्त धोकादायक असल्याचे वृत्त असतानाच एक चांगली बातमी आहे. मुलांसाठी सुद्धा लवकरच व्हॅक्सीन उपलब्ध होऊ शकते. केंद्र सरकारने शुक्रवारी संकेत दिले आहेत की, मुलांसाठी कोरोनाची लस याच महिन्यात येऊ शकते. सरकारनुसार, जायडस कॅडिला ( zydus vaccine) च्या व्हॅक्सीनला लवकरच मंजूरी दिली जाऊ शकते, जायडस कॅडिला ( zydus vaccine) या लसीची चाचणी 12-18 वर्ष वयाच्या मुलांवर सुद्धा झाली आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हटले की,
सध्या कोव्हॅक्सीनची मुलांवर चाचणी सुरू आहे, परंतु ती पूर्ण होण्यास जास्त वेळ लागणार नाही,
कारण चाचणी प्रतिकारशक्तीची होते. तर जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनची चाचणी मुलांवर झाली आहे. आशा आहे की, पुढील दोन आठवड्या ती लायसन्ससाठी येऊ शकते. लसीला मंजूरी देताना ती मुलांना देण्याबाबत सुद्धा निर्यण घेतला जाऊ शकतो.

चाचणी 800-100 मुलांचा सहभाग
जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनच्या तिसर्‍या टप्पयातील चाचणी पूर्ण झाली आहे.
या चाचणीत 800-100 मुले सहभागी होती, ज्यांचे वय 12-18 वर्षाच्या दरम्यान आहे.
यासाठी या व्हॅक्सीनला 12-18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुद्धा मंजूरी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.
पॉल यांनी सुद्धा संकेत दिल आहेत.
मात्र, अंतिम निर्णय एक तज्ज्ञ गट चाचणीच्या आकड्यांच्या आधारावर घेतो.
जर दोन आठवड्यांच्या आत लायसन्ससाठी अर्ज केला तर जास्तीत जास्त आणखी एक आठवडा मंजूरीसाठी लागेल. म्हणजे याच महिन्यात लस उपलब्ध होऊ शकते.

यडस कॅडिला लसीची माहिती
* ही व्हॅक्सीन तीन डोसची आहे. * ही त्वचेसाठी दिली जाणारी इंट्राडर्मल लस आहे.* ती इंजेक्शनने न देता एका वेगळ्या डिव्हाईसने त्वचेच्या आत टाकली जाते. * यासाठी मुलांना ती जास्त उपयोगी आहे.  * ही लस यूके, ब्राझील, दक्षिण अफ्रीकासह डबल व्हेरिएंटवर सुद्धा अलिकडेच अपडेट केली आहे. * लसीची चाचणी सुमारे 28 हजार लोकांवर झाली आहे, ज्यामध्ये एक हजारच्या जवळपास 12-18 वर्षाची मुले आहेत. * भारतात 12-18 वर्ष वयोगटाची सुद्धा 13-14 कोटी लोकसंख्या असल्याने त्यांच्यासाठी किमान 25-26 कोटी डोस हवे आहेत. * कॅडिला दरमहिना 1-2 कोटी डोस तयार करू शकते. आता ही क्षमा 2.5-3 कोटी होईल.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !