पिंपरी येथे बालदिन उत्साहात साजरा

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपरी येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, मासुम व प्राथमिक शाळा पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने या बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुरूवातीला मुलांनी प्रभात फेरी काढुन बाल दिनांचा विजय असो, मुलगा मुलगी एक समान, बाल विवाह थांबवा, बाल मजुरी थांबवा अशा घोषणा देऊन जनजागृती केली. त्यानंतर ग्रामपंचायत पिंपरी येथे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच मिनाताई शेंडकर यांनी करून जयंती साजरी करण्यात आली. प्राथमिक शाळा पिंपरी येथे मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी कृषीभुषण महादेव शेंडकर, उपसरपंच विजय थेऊरकर, पोलिस पाटील शिवाजी शेंडकर, मुख्याध्यापक भोसले, मासुम संस्थेचे सचिन गोधंळे, शितल चव्हाण,रेखा मारणे, अशोक लिभोंरे, अर्जुन मोघे, सिताराम तांबे यांच्या सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाल पंचायत सदस्य अनिकेत कुंभार हे होते. सुत्रसंचालन सोनाली शेंडकर, प्रास्ताविक सिध्दी राऊत यांनी केले. आभार दर्शन शेंडकर यांनी मानले. सर्व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Visit : Policenama.com