Children’s Day : नोकरी करण्यापूर्वी तुमचा मुलगा बनू शकतो करोडपती, जाणून घ्या काय आहे प्लॅन ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाल दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला गुंतवणुकीसाठी एका अशा स्कीमबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा मुलगा नोकरी करण्यापूर्वी करोडपती बनेल. म्यूच्युअल फंड गुंतवणुकीचा चांगला पयार्य मानला जातो. म्यूच्युअल फंडाद्वारे तुम्ही केवळ तुमच्या नावावर नाही तर तुमच्या मुलाच्या नावावर सुद्धा गुंतवणूक करू शकता. जर आई-वडिलांनी योग्यपद्धतीने गुंतवणूक केली तर मुल 18 वर्षांचे होता-होता करोडपती सुद्धा होऊ शकते. याबाबत जाणून घेवूयात…

कशी करावी गुंतवणूक :
मुलासाठी सिंगल नावानेच म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करता येईल. अशा गुंतवणुकीत पालकाच्या नावाची गरज असते. मुलांच्या नावावर म्यूचुअल फंड घेण्यासाठी मुलाचे बर्थ सर्टिफिकेट असणे जरूरी आहे. मुलाचा पासपोर्ट असेल तर तो सुद्धा मान्य आहे. यासोबतच वडिलांचे कागदपत्र आवश्यक असतात.

सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) : म्यूच्युअल फंड गुंतवणुकीची सर्वात चर्चित पद्धत आहे. मुलांच्या नावाने गुंतवणुकीत सुद्धा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये पैसे लावणे सर्वात फायद्याचे ठरू शकते. मात्र, मुलाचे वय 18 वर्ष झाल्यानंतर यामध्ये गुंतवणूक करता येणार नाही. मुल 18 वर्षाचे झाल्यावर एका प्रक्रियेनंतर संपूर्ण पैसे मुलाच्या नावावर होतील.

18 वर्षात करोडपती होऊ शकते मुल :
मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या नावावर 5,000 रूपयांपासून गुंतवणूक सुरू करा. या गुंतवणुकीत दर वर्षी 15 टक्केची वाढ करत जा. जर या गुंतवणुकीवर सरासरी प्रत्येक वर्षी 12 टक्क्यांचे रिटर्न मिळाले तर 18 वर्षात मुल करोडपती होऊ शकते.