home page top 1

१५ ऑगस्ट दिवशी प्रत्येक गावात बालहक्कांचा जागर

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – भारताच्या स्वातंत्र्याला ७२ वर्ष पूर्ण होता असताना भारतात आजही बालकांच्या हक्काकडे तितक्या गांभीर्याने पहिले जात नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने देखील बालकांच्या हक्कासाठी अनेक कायदे बनवले आहेत. मात्र भारतासारख्या विकसनशील देशात याकडे अजूनही दुर्लक्ष झालेलेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे या स्वातंत्रदिनी बालकांच्या हक्कांचा जागर केला जाणार आहे.
यासाठी संयुक्त राष्ट्राने ठरवून दिलेल्या करारानुसार बालकांचे हक्क आणि सुरक्षितता यासाठी उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्याचे शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी यासाठी सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या सीईओंना आदेश दिले आहेत. बालकांच्या बुद्धीचा विकास तसेच त्यांच्या शारीरिक व जीविताच्या अधिकारांचा देखील विकास होण्यासाठी संयुक्त राष्ट्र्राने विविध उपक्रम तयार केले होते. मात्र मागील २६ वर्षांपासून यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नसून यामध्ये सुधारणा करण्यासाठी १५ ऑगस्ट या दिवशी याची पुन्हा एकदा आठवण करून दिली जाणार आहे. विविध गावांमध्ये आणि शाळांमध्ये त्यासाठी उपक्रम राबविण्याचे आदेश शिक्षण सचिवांनी दिले आहेत. यासाठी केवळ भाषणबाजी केलेली चालणार नसून यासाठी ठोस पावले उचलली जायला हवीत, असे देखील त्यांनी म्हटले.

हे उपक्रम राबविले जाणार
यासाठी प्रत्येक ग्रामसभेत बालहक्क संरक्षणाचा ठराव घेणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर प्रभातफेरीमध्ये बालकांच्या हक्कांचे फलक देखील फिरवले जाणार आहेत. यावेळी मान्यवर व्यक्तींकडून बालहक्क सरंक्षणाची शपथ देखील घेतली जाणार आहे. या मान्यवरांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

हे आहेत बालकांचे हक्क
१) विकासाचा हक्क : यामध्ये मोफत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण त्याचबरोबर सर्व प्रकारचे शिक्षण घेण्याच्या अधिकारांचा समावेश आहे.

२) सहभागाचा हक्क : यामध्ये स्वतःचे विचार ऐकवण्याच्या अधिकारांचा समावेश आहे.

३) जगण्याचा हक्क : यामध्ये हवे तसे राहणीमान मिळवण्याचा, आरोग्यसेवेचा त्याचबरोबर जीविताचा तसेच विकासाच्या हक्कांचा समावेश आहे.

४) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क : यामध्ये सभा घेण्याचा तसेच माहिती मिळवण्याच्या अधिकारांचा समावेश होतो.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like