रेल्वेरूळालगत आढळला बालकाचा मृतदेह, नरबळीचा संशय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

एका बालकाचा मृतदेह रेल्वेरुळालगत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूरमधील गोवा कॉलनी येथे हा निर्घृण प्रकार घडला असून हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह आढल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तातडीने येऊन पोलिसांनी पंचनामा करत आजूबाजूच्या परिसरात कसून तपासणी केली. दरम्यान, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करत आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe8098d7-cc3a-11e8-b36e-57aac6a10031′]

खून झालेल्या या मुलाचे वय अंदाजे अडीच वर्ष आहे. मृतदेहाच्या अंगावर दगड रचून ठेवण्यात आले होते. त्याच्या शरिरावर कोणतीही जखम आढळून आली नाही. ही हत्या २४ तासांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही हत्या अंधश्रद्धेतून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण खून झाला त्यादिवशी सोमवारी सर्वपित्री अमावस्या होती. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा सुरू होती. पोलिसांनी याबाबत स्पष्ट माहिती अद्याप दिलेली नाही. खून झालेल्या बालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

येत्या 6 आठवड्यात साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ नेमा- सुप्रीम कोर्ट

कुत्र्यात सापडल्या चक्क ५० दारूच्या बाटल्या

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असून दारूची तस्करी करण्यासाठी काहीजण सलाईन बाटल्या तसेच पेट्रोल टँकचा वापरही करतात. अशाच एका तस्काराला नागपूरच्या आरपीएफ पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या कुत्र्यात चक्क दारूच्या पन्नास बाटल्या पोलिसांना सापडल्या. याचा एक व्हिडिओ नागपूरच्या आरपीएफ पोलिसांनी काढला असून तो सध्या व्हायरल होत आहे. आरपीएफ पोलीस गस्त घालताना अतिशय ढिले कपडे घातलेला व्यक्ती रेल्वे स्थानकावर दिसला. या संशयातून पोलिसांनी त्या व्यक्तिची कसून चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारूची तस्करी करत असल्याची कबुली आरपीएफ जवानांना दिली. पोलीस आरोपीची पडताळणी करत असताना तब्बल ५० देशी दारूच्या बाटल्या आरोपीच्या शर्टमधून पोलिसांनी काढल्या.

[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’527d250f-cc3b-11e8-926f-d1774d8872ed’]