बाल रंगभूमीचे जनक श्रीनिवास शिंदगी यांचे निधन

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

बालरंगभूमीचे जनक आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास शिंदगी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

श्रीनिवास शिंदगी यांनी गेली ६० वर्ष बालनाट्य चळवळ अविरत चालू ठेवली होती. शिंदगी यांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक बालनाट्ये गाजली. शिंदगी यांच्या मार्गदर्शनाखाली बालवयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेकजण पुढे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणू नावाजले गेले.

[amazon_link asins=’8131901378′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1ce3ad3-8588-11e8-960b-5bf43c9dfc68′]

शिंदगी याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी बालरंगभूमीचे जनक अशी उपाधी दिली होती. शिंदगी यांनी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये मोठे योगदान आहे.

त्यांच्या ‘पुंगीवाला’ बालनाट्याचे  दिग्दर्शन सुलभा देशपांडे यांनी केले होते. पुंगीवाला हे बालनाट्य मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणारे पहिले बालनाट्य ठरले.

श्रीनिवास शिंदगी यांनी आजवर २० नाटके लिहिली  त्यापैकी १५ बालनाट्ये आहेत.  दरवर्षी सुट्ट्यांमध्ये शिंदगी यांनी लहान मुलांसाठी अभिनय वर्ग सुरु करून शेकडो बाल कलाकार गेल्या ६० वषार्पासून घडवले.

दहालाखाच्या धनी या  नाटकाच्या वेळी शिंदगी यांनी टेपरेकॉर्डरच्या सहाय्याने संगीत या आधुनिक तंत्राचा पहिल्यांदा वापर केला. प्रख्यात अभिनेत्री व सौंदर्याचा आयटमबॉम्ब म्हणून ज्यांनी रंगभूमीवर व चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली त्या पद्मा चव्हाण यांनी रंगभूमीवरील पहिला प्रवेश याच नाटकातून केला होता.