Chin Hair | महिलांच्या हनुवटीवर केस येणे असू शकतो ‘या’ आजारांचा संकेत, जाणून घ्या कोणते

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chin Hair | महिलांना नितळ आणि सुंदर त्वचा हवी असते. मात्र, चेहर्‍यावरील अनावश्यक केसांमुळे अनेक महिलांना त्रास होतो. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी महिला विविध उपायांचा अवलंब करतात. मात्र, तरीही या समस्येतून त्यांची सुटका होत नाही. स्त्रियांच्या चेहर्‍यावर नको असलेले केस बहुतेक गालावर, कपाळावर, ओठांवर आणि हनुवटीवर दिसतात. या नको असलेल्या केसांबद्दल महिला अनेकदा कॉन्शियस होतात. (Chin Hair)

 

महिला या नको असलेल्या केसांपासून व्हॅक्स वगैरेच्या माध्यमातून सुटका करून घेतात. परंतु तज्ञांच्या मते, हनुवटीवर दिसणारे हे केस देखील आरोग्याच्या समस्यांचे संकेत असू शकतात. अशा परिस्थितीत महिलांनी हनुवटीच्या केसांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

 

1. गर्भधारणेचा संकेत :
गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे हनुवटीवर केस येतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या चेहर्‍यावरचे केस अचानक वाढू लागले असतील तर तो गर्भधारणेचा संकेत असू शकतो. (Chin Hair)

 

2. आनुवंशिकता :
आनुवंशिकतेमुळेसुद्धा हनुवटीवर केस येण्याची समस्या असू शकते. आई, मावशी, आजी किंवा बहिणींना ठराविक वयात हनुवटीचे केस आले असतील, तर तुम्हालाही हा त्रास होऊ शकतो.

3. PCOS :
PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा एक प्रकारचा हार्मोनल डिसऑर्डर आहे, जो शरीरातील मेल हार्मोन एंड्रोजनच्या वाढीमुळे होतो. पीसीओएस मुळे मासिक पाळीतील अनियमितता, अ‍ॅक्ने आणि गरोदरपणातील समस्या यासारख्या समस्या उद्भवतात. हनुवटीवरचे केसही PCOS या आजारात येतात.

 

4. कुशिंग सिंड्रोम :
कुशिंग सिंड्रोम हा एक प्रकारचा एंडोक्राइन डिसऑर्डर आहे. या समस्येमध्ये हनुवटीवर केस येण्याची समस्या वाढते.
शरीरातील स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल वाढल्यामुळे ही समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत, हनुवटीचे केस देखील कुशिंग सिंड्रोमचे लक्षण असू शकतात.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला हनुवटीवर केस येण्याची समस्या असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Chin Hair | chin hair can be sign of these health related problems women health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fatty Liver | सकाळी उठल्यावर डोळ्यांवर येत असेल सूज, तर असू शकतो फॅटी लिव्हरचा संकेत; जाणून घ्या सविस्तर

Sudden Weight Loss | जलदगतीने वजन कमी होणे हे ‘या’ 4 गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, जाणून घ्या

Arthritis Cause Cauliflower | फ्लॉवर खाल्ल्याने वाढू शकते युरिक अ‍ॅसिड, हिवाळ्यात होऊ शकतो चालण्या-फिरण्याचा त्रास