खेळताना 100 फुटांवरून खाली पडला 2 वर्षांचा चिमुकला, पाहा Video

पोलीसनामा ऑनलाईन टीम – खेळताना अचानक इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून दोन वर्षांचा  मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली.  खाली उभ्या असलेल्या व्यक्तीने मुलाचा जीव वाचवला. घटनेचा श्वास रोखून ठेवणारा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना चीनच्या जिआंग्सु प्रांतताच्या हुवाई शहरात घडली आहे.

चिमुकला साधारण 100 फूट उंचीवर असलेल्या बाल्कनीच्या टोकावर लटकलेला होता. खिडकीतून तोल गेल्याने खाली पडला. त्याने खिडीबाहेर असलेल्या स्लोपला घट्ट पकडून धरुन वाचवण्यासाठी ओरडू लागला. त्याच दरम्यान खाली उभ्या असलेल्या तरुणाने मुलाचा जीव वाचवला आहे. हा तरुण देवदूतच बननून आला. ही संपूर्ण घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिनी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार चिमुकला घरात एकटाच होता. त्याला बेडरुममध्ये पालकांनी बंद करून ठेवले होते. मात्र घाईत असल्याने कुटूंबिय बेडरूमची खिडकी बंद करायला विसरले.

या चिमुकल्याने आधी खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एअर कंडिशन ठेवलेल्या स्लोपवर अडकल्याने तो घाबरला. त्यामुळे त्याचे खिडकीला पकडलेले हात सुटले आणि खाली पडणार एवढ्यात त्याला तरुणाने वाचवले आहे.