Corona Virus : ‘कोरोना’ वर ‘डॉक्टर’ चं तोंडच बंद केलं, 900 जणांच्या मृत्यूनंतर चीनमध्ये ‘स्वतंत्र’ तेची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 900 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन सरकारवर आरोप आहे की त्यांनी या आजारावर वेळेत उपाय केले असते तर परिस्थिती इतकी वाईट झाली नसती.

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सर्वात आधी माहिती देणाऱ्या डॉक्टर ली वेनलिआंगवर स्थानिक पोलीस गप्प राहण्यासाठी दबाव टाकला होता. त्यांनी माहिती दिली होती की संशयित कोरोना व्हायरसचे पीडित रुग्ण असू शकतात. परंतु पोलिसांनी सुरुवातीपासून ही अफवा असल्याचे सांगितले.

त्यानंतर 34 वर्षीय डॉक्टर ली वेनलिआंग स्वत: देखील कोरोना व्हायरसचे बळी ठरले. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. ली यांच्या मृत्यूनंतर अकादमी समुदायातील लोकांचा बांध फुटला आणि त्यांनी चीनमध्ये राजकीय बदल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी केली.

एका वृत्तानुसार ली त्या आठ डॉक्टरांमध्ये सहभागी आहेत ज्यांना वुहान पोलिसांनी अफवा पसरवणारे ठरवले होते. त्यांच्या मृत्यूनंतर, अकादमी जगतातील लोकांनी कमीत कमी दोन खुले पत्र सोशल मीडियावर व्हायरल केली होती.

डॉक्टर ली यांनी मृत्यूपूर्वी चीनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, त्यात सांगण्यात आले होते की पोलिसांनी त्यांना स्वाक्षरी करण्यास जबदस्ती केली ज्यात म्हणले होते की कायदा तोडणाऱ्या चूका करुन नका. असे केल्यास त्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात येतील. वृत्तानुसार अभिव्यक्ती स्वतंत्र्यांची मागणी करणाऱ्या एका पत्रावर वुहानमधील 10 प्रोसेफरची स्वाक्षरी आहे. पत्रात याचा उल्लेख आहे की डॉक्टर ली यांनी पूर्ण ताकदीने देश आणि समाज हिताचे काम केले होते.

डॉक्टर ली यांनी सार्वजिक पद्धतीने माफी मागण्याचे आवाहन केले होते. यानंतर चीनच्या सोशल मीडिया Weibo वर कथित पद्धतीने हे पत्र सेंसर केले होते. दुसरे पत्र बीजिंगच्या प्रतिष्ठित यूनिवर्सिटी Tsinghua च्या एलुमनी समूहाने लिहिले होते. या पत्रात आवाहन केले होते की अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांच्या संविधानिक आधिकाऱ्यांची गारंटी द्यावी. चीनमध्ये सरकारविरोधीत आवाज उठवल्यास कारवाई केली जात आहे आणि विरोध करणाऱ्या लोकांना तुरुंगात पाठवले जात आहे.