जगाला ‘कोरोना’ देणार्‍या चीनवर निर्सगाची ‘मार’, 106 जणांचा मृत्यू अन् कोट्यवधींचे नुकसान

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चीनमध्ये पावसाने कहर केला आहे. आतापर्यंत पावसामुळे जवळपास 106 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या यिचांग शहरात पावसामुळे गलिच्छ पाणी लोकांच्या कमरेपर्यंत भरले आहे. येथील रस्त्यावर पाणी इतके वाढले आहे की, लोकांच्या गाड्या अडकल्या आहेत, त्यांना ते रस्त्यावर चालवू शकत नाही. रस्ते कालव्यासारखे भरली आहेत. यांगशुओ या पर्यटन शहरातही ढगफुटीची घटना घडली आहे. या मुसळधार पावसामुळे दक्षिण चीनमध्ये बरेच नुकसान झाले आहे. 15 लाख लोक पुरामुळे बाधित झाले आहेत.

हुबेई प्रांत पावसाच्या पाण्याने सर्वाधिक त्रस्त आहे. पावसाळ्याआधी हा परिसर कोरोनामुळे प्रभावित झाला होता. आता येथे पावसाने कहर केला आहे. येथे इतके पाणी साचले आहे की लोकांना परिसर सोडून इतर ठिकाणी जावे लागत आहे. कोरोना व्हायरस मुळे, चीनचा हा प्रांत बर्‍याच दिवसांपासून पूर्णपणे बंद होता, आता येथे जेव्हा काही क्रियाकलाप सुरू झाले तेव्हा पुराने कहर माजवला आहे. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार ते आधीपासून कोरोनामुळे त्रस्त होते, आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. असे म्हटले जाते की जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चीनच्या नद्यांमध्ये पाणी वाढते, यामुळे तेथे पूर येतो.

तसे दरवर्षी सरकार पुराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार असते, पण यावेळी कोरोना व्हायरसमुळे, त्याला तयारीची संधी मिळू शकली नाही. ज्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली. कोरोनाव्हायरस नंतर, या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची संधी मिळाली नाही. शुक्रवारी, राष्ट्रीय हवामान केंद्राने शनिवारपासून चीनच्या दक्षिण- पश्चिम भागात आणखी एका पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

तज्ज्ञांनी जलाशय आणि धरणांवर संभाव्य दरडी कोसळणे व फुटण्याचा इशारा दिला आहेत. चीनमधील सर्वात लहान जलाशयांचे बांधकाम 1960 आणि 70 च्या दशकात केले गेले होते, त्या दरम्यान त्यांचे बांधकाम उच्च बांधकाम मानकांचे पालन करीत नव्हते.