चीनच्या मिसाइलने हजारो किमी अंतरावरून उडवली युद्धनौका, PLA ने दिला हा इशारा

गुवाहाटी : चीनच्या दोन एयरक्राफ्ट कॅरियर किलर मिसाइलने हजारो किलोमीटर अंतरावरून युद्धनौकांना उडवून दाखवले आहे. या युद्धनौका समुद्रात गस्त घालत होत्या. चीनने या मिसाईलची मागील ऑगस्टमध्ये चाचणी घेतली होती. परंतु, आता पहिल्यांदा त्यांची माहिती जाहीर केली आहे. चीनच्या एका सैन्य तज्ज्ञाने सांगितले की, या दोन्ही मिसाइलने साऊथ चायना सी येथील परासेल बेटांजवळील युद्ध नौकेला निशाणा बनवले.

पेइचिंगच्या बीइहांग युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि माजी कर्नल वांग शियांगसूई यांनी म्हटले की, डीएफ-26बी आणि डीएफ-21डी मिसाइल्सने आपले लक्ष्य उध्वस्त केले. डीएफ-26बी मिसाइल उत्तर-पश्चिम किंगहाई प्रांतातून सोडण्यात आले होते आणि दुसरे मिसाइल डीएफ-21डी चीनच्या पूर्व भागातील झेजियांग प्रांतातून सोडले होते. या मिसाइल्सची चाचणी अशावेळी करण्यात आली होती, जेव्हा चीनने आरोप केला होता की, अमेरिकेचे यु-2 हेरगिरी विमान परवानगीशिवाय चीनी युद्ध सरावाच्यावेळी बोहाई समुद्राच्या किनार्‍यावर आले होते.

डीएफ-21चा निशाणा अचूक असतो. सैन्य तज्ज्ञ यास कॅरियर किलर म्हणतात. त्यांचे म्हणणे आहे की, हे अमेरिकन विमान वाहकनौकांना निशाणा बनवण्यासाठी विकसित करण्यात आले आहे, ज्या चीन सोबतच्या संभाव्य संघर्षात वापरली जाऊ शकतात. अमेरिकेने या चीनी मिसाइल परीक्षणानंतर धमकी दिली होती की, जर मिसाइलने अमेरिकन युद्धनौकांना निशाणा बनवले तर त्याचे गंभीर परिणाम होतील. वांग यांनी म्हटले की, या मिसाइलची यशस्वी चाचणी अमेरिकेसाठी इशारा आहे. त्यांच्यासाठी चीनच्या विरूद्ध कोणतीही सैन्य कारवाई करणे जोखिमचे ठरू शकते, हेच चीनने दर्शवले आहे.