चीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन China आणि पाकिस्तान Pakistan आपल्या अण्वस्त्रांचा Nuclear साठा सतत वाढत आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूट (एसआयपीआरआय) च्या रिपोर्टनुसार, यावर्षी जानेवारीपर्यंत चीनकडे 350, पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 156 अण्वस्त्र आहेत. एसआयपीआरआयच्या SIPRI माहितीनुसार, रशिया आणि अमेरिकाकडे अंदाजे 13,080 जागतिक अण्वस्त्रापैकी 90 टक्केपेक्षा जास्त आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

डिलिव्हरी सिस्टम महत्वाची
भारताला चीन आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांमुळे कोणताही फरक पडत नाही. भारतीय अधिकार्‍यांनुसार अण्वस्त्रांच्या संख्येपेक्षा जास्त त्याची डिलिव्हरी सिस्टम Delivery System महत्वाची ठरते. भारतीय लष्कराला 5,000 किलो मीटर अंतरावर मारा करणारी अग्नी-व्ही इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल मिळणार आहेत, ज्याच्या टप्प्यात चीन आणि पाकिस्तान पूर्णपणे येईल.

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 351 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

एसआयपीआरआयच्या स्टडीत सोमवारी म्हटले होते की,
चीन, पाकिस्तान आणि भारत आपल्या अणू शस्त्रसाठ्याचा Nuclear विस्तार करत आहेत.
मागील वर्षी जानेवारीपर्यंत चीनकडे 320, पाकिस्तानकडे 160 आणि भारताकडे 150 अण्वस्त्र होती.
जगात एकुण नऊ देश अमेरिका, रशिया Russia, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरियाकडे अण्वस्त्र आहेत.
अभ्यासात म्हटले आहे की, चीन अण्वस्त्रांच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहे,
तर भारत आणि पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्र साठा वाढवत आहेत.

5 मे 2020 ला पूर्व लडाखमध्ये Ladakh भारत आणि चीनच्या लष्करातील तणावाला एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे.
या दरम्यान 45 वर्षात पहिल्यांदा दोन्ही बाजूंकडून घातक परिणाम दिसून आले.
भारत आणि चीनने पँगाँग सरोवर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मर्यादित प्रगती केली आहे, तर इतर बाबतीत तणाव कायम आहे.
तर, भारत आणि पाकिस्तानने यावर्षी 25 फेब्रुवारीला आपल्या लष्करी अभियानाचे महासंचालकांमध्ये चर्चेनंतर नियंत्रण रेषेवर संघर्ष विरामाची घोषणा करत एक संयुक्त वक्तव्य जारी केले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : china and pakistan appear to be expanding their nuclear arsenals 

हे देखील वाचा

Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना