China App | ‘चीनी अ‍ॅप’च्या माध्यमातून त्याने 4 महिन्यात 50 लाख लोकांना घातला 250 कोटींना गंडा, जाणून घ्या प्रकरण

डेहराडून : वृत्तसंस्था – चीनच्या स्टार्ट अप (China App) योजनेतून बनलेल्या एका अ‍ॅपच्या माध्यमातून एकाने गेल्या ४ महिन्यात तब्बल ५० लाख लोकांना २५० कोटी रुपयांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्याने लोकांना १५ दिवसात पैसे दुप्पट करण्याचा दावा केला होता. त्यात लोक कोणताही मागचा पुढचा विचार न करता पैसे देत असल्याचो आढळून आले आहे. चीनच्या एका पॉवर बॅक अ‍ॅप (China App) च्या माध्यमातून ही सर्व फसवणूक केली गेली असून अशाप्रकारे अल्पवधीत २५० कोटी रुपयांहून अधिक पैशांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे पाहून पोलीसही चकरावले आहेत. या प्रकरणी डेहराडुनला दोन आणि बंगलुरु येथे एक गुन्हा दाखल झाला आहे.

कर्ज पाहिजे असलेल्या लोकांना फसवणूक करणार्‍या लोकांना पॉवर बॅक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगत.
त्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना १५ दिवसात पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखविले जात.
गेल्या ४ महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता.
उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये राहणार्‍या एकाने पोलिसांकडे तक्रार केली.
त्याने पॉवर बॅक अ‍ॅपमध्ये (China App) ९३ हजार आणि ७२ हजार रुपये अशा प्रकारे दोनदा पैसे गुंतवले होते.
पण, १५ दिवसात ते दुप्पट झाले नसल्याची तक्रार केली.
पोलिसांनी याचा तपास केल्यावर त्याचे पैसे वेगवेगळ्या खात्यात ट्रॉन्सफर केले गेले होते.
त्यातून परदेशी सायबर चोरट्यांचा हा सर्व प्रकार असल्याचे उघड झाले.

उत्तराखंड एसटीएफ एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की,
पोलिसांच्या तपासात परदेशात राहणार्‍या सायबर चोरट्यांनी भारतातील लोकांना कमीशनचे आमिष दाखवून त्यांच्याद्वारे अ‍ॅपच्या (China App) माध्यमातून अगोदर लोकांना कर्ज देण्याची गोष्ट केली जायची.
त्यानंतर त्यात बदल करुन लोकांना १५ दिवसात पैसे डबल करण्याचे आमिष दाखविले जात.
लोकांचा विश्वास बसण्यासाठी त्यांनी अगोदर काही लोकांच्या खात्यात दुप्पट पैसे भरलेही होते.

या तपासात नोएडातील पवन पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडे तब्बल ५९२ सीम कार्ड, १९ लॅपटॉप, ५ मोबाईल फोन, ४ एटीएम कार्ड आणि एक पासपोर्ट जप्त केला आहे.

क्रिस्टो करंसीमार्फत परदेशात पाठविली जात होती रक्कम
या तपासात पोलिसांकडे धक्कादायक बाबी पुढे येत गेल्या आहेत. लोकांच्या खात्यात जमा झालेली रक्कम क्रिस्टो करन्सीमध्ये रुपांतरीत करुन ती परदेशात पाठविली जात होती, असे समोर आले आहे.

या परदेशी चोरट्यांचा हात असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी आय बी आणि रॉ या केंद्रीय तपास संस्थांना याची माहिती दिली आहे. या प्रकरणातील परदेशात राहणार्‍या आरोपींची माहिती त्या त्या देशांच्या दुतावासांना देण्यात आली असून त्यांच्याकडून या आरोपींची माहिती मागविण्यात आली आहे.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण