Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस अ‍ॅन्टीबॉडीज सोबत जन्मलं बाळ, डॉक्टर देखील ‘हैराण-परेशान’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस अ‍ॅन्टीबॉडीजसह बाळाचा जन्म झाला आहे. हे प्रकरण चीनच्या शेनझेनचे आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बाळाला हे अ‍ॅन्टीबॉडीज नैसर्गिकरित्या आईकडून मिळाले आहे. शेन्झेन थर्ड हॉस्पिटलने म्हटले आहे की, महिला आणि बाळाचे प्रकरण समजून घेण्यासाठी ते अधिक अभ्यास करणार आहे. आईला एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यांना कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. प्रसुतिनंतर तपासणी केली असता बाळ व आई दोघांचाही अहवाल नकारात्मक आला होता.

30 मे रोजी शेनझेन थर्ड हॉस्पिटलमध्ये या महिलेने बाळाला जन्म दिला. ही महिला मूळचे हुबेईची आहे. कोरोना महामारीची सुरुवात हुबेईच्या वुहानपासून झाली. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बाळामध्ये नैसर्गिकरित्या व्हायरसला लढा देण्याची क्षमता आहे.

चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, या महिलेचे बदललेले नाव झिआओ असे सांगितले गेले आहे. एप्रिलच्या सुरुवातीला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आल्यानंतर झिआओचा उपचार सुमारे 10 दिवस चालू होता.

झिआओ शेनझेन मध्ये राहते आणि काम करते. पण जानेवारीत ती आपल्या पतीबरोबर हुबेईच्या वूचांग शहरात गेली होती जिथे तिचे कुटुंब राहते. यावेळी तिला कोरोनाची लागण झाली होती. जिओच्या आईचाही फेब्रुवारीमध्ये कोरोना अहवाल सकारात्मक आला होता.