आता चीनच्या फॅक्टरीमध्ये लीक झाला खतरनाक ‘बॅक्टेरिया’, 1000 पेक्षा जास्त लोक ‘पॉझिटिव्ह’, जाणून घ्या ‘ब्रुसेल्लोसिस’ म्हणजे काय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर-पूर्व चीनमध्ये हजारो लोक बॅक्टेरियाने संक्रमित झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या वर्षी एका बायोफार्मास्युटिकल कंपनीतील गळतीमुळे हा आजार झाला आहे. गांसुची (Gansu) राजधानी लान्झोऊ येथे आरोग्य आयोगाने जाहीर केले की, ३,२४५ लोकांना हा ब्रुसेल्लोसिस (brucellosis) आजार झाला आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, हा आजार ब्रुसेला या बॅक्टेरियामुळे होतो. साधारणपणे हा जीवाणू पशुधनामध्ये आढळतो. पशुधन म्हणजे प्राण्यांचा समूह जो शेतीशी संबंधित वातावरणात अन्न, फायबर आणि श्रम इत्यादी मिळवण्यासाठी पाळीव असतो. आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या जुलैपासून ऑगस्टमध्ये झोन्गमु लांझोऊ बायोलॉजिकल फार्मास्युटिकल फॅक्टरीत हा आजार सुरू झाला.

११ हजार ४०१ लोकांना या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. या बॅक्टेरियासाठी आतापर्यंत एकूण २१ हजार ८४७ जणांची तपासणी करण्यात आली आहे. शहराची एकूण लोकसंख्या २९ लाख आहे. या आजाराचे नाव माल्टा फिवर (Malta fever or Mediterranean fever) आहे. यात ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा इत्यादी लक्षणांचा समावेश आहे. यापैकी काही समस्या गंभीर स्वरूप घेऊ शकतात आणि कधीच संपणार नाहीत, जसे की संधिवात किंवा काही अवयवांवरील सूज.

अमेरिकेच्या डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) नुसार, या रोगाचा संसर्ग मानवांशी परस्पर संपर्कामुळे होत नाही, तर संक्रमित अन्न, पाणी किंवा श्वासाद्वारे पसरू शकतो. प्राण्यांसाठी ब्रुसेला लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत कालबाह्य सॅनिटायजर वापरले गेले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like