अज्ञात व्हायरसांकडून आणखी होऊ शकतात हल्ले, ‘कोरोना’ छोटं प्रकरण : चीनी जाणकार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  चीनमधील एका प्रमुख व्हायरोलॉजिस्टने नवीन व्हायरसच्या हल्ल्याबद्दल म्हटले आहे की कोरोना व्हायरस ही एक ‘छोटी बाब’ आहे आणि ही फक्त समस्येची सुरुवात आहे. चीनच्या संदिग्ध संस्था वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे उपसंचालक शी झेंगली यांनी चीनच्या सरकारी टेलिव्हिजनवर बोलताना नवीन विषाणूंबाबत इशारा दिला आहे.

एका वृत्तपत्रानुसार झेंगलीने वटवाघुळांमध्ये उपस्थित असलेल्या बॅट कोरोना विषाणूवर संशोधन केले आहे. याच कारणास्तव त्यांना चीनची ‘बॅट वूमन’ असे देखील म्हटले जाते. शी झेंगली म्हणाल्या की व्हायरसवरील संशोधनाबाबत सरकार आणि वैज्ञानिकांनी पारदर्शक राहिले पाहिजे. ते म्हणाले की जेव्हा विज्ञानाचे राजकारण केले जाते तेव्हा ते फार वाईट असते.

सीसीटीएनशी बोलताना शी झेंगली म्हणाल्या की जर आपल्याला पुढील संक्रामक आजारापासून मनुष्यांचे संरक्षण करायचे असेल तर आपल्याला जीवांमध्ये उपस्थित असलेल्या अज्ञात विषाणूंविषयी माहिती गोळा करावी लागेल आणि चेतावणी द्यावी लागेल. तसेच त्यांनी स्पष्ट केले की जर आपण अज्ञात व्हायरसचा अभ्यास केला नाही तर आणखी एक संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे. शी झेंगली यांची ही मुलाखत अशा वेळी प्रसारित करण्यात आली आहे जेव्हा चीनच्या अग्रगण्य नेत्यांची वार्षिक बैठक सुरू होणार आहे.

त्याचबरोबर जगातील अनेक देश वुहानमध्ये असलेल्या चिनी लॅबला संशयाने पहात आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही सांगितले की कोरोना विषाणूचा संसर्ग चिनी लॅबमधून पसरल्याचा मोठा पुरावा देखील आहे. तथापि, चीन आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी अशा प्रकारच्या आरोपांना नकार देत आहेत.