बिजींगमध्ये ‘कोरोना’ व्हायरसच्या रूग्णांसाठी बनवलेलं स्पेशल हॉस्पीटल होतंय बंद, आता राहिला नाही एकही रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या महामारीसाठी तयार केलेली रुग्णालये आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर, देशाच्या एपिसेंटर वुहानने रविवारी शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज दिला आणि देशातील १६ तात्पुरती रुग्णालये बंद केली.

चीनमधील महामारीचे केंद्र असलेल्या वुहान शहराच्या रुग्णालयातून शेवटच्या संक्रमित रूग्णाला बरे झाल्यावर रविवारी सोडण्यात आले आणि सर्व खुली केलेली तात्पुरती (तात्पुरती) रुग्णालये बंद केली. यानंतरच सर्व तात्पुरती रुग्णालये बंद करावीत असा निर्णय बीजिंगनेही घेतला. आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की चीनमध्ये संसर्गाची ६ नवीन प्रकरणे आढळली आहेत आणि ४० प्रकरणं अशी आहेत ज्यांच्यात लक्षणे आढळली नाहीत.

बीजिंगमध्ये शियाटांगशान रुग्णालयाचा वापर वर्ष २००३ मध्ये सार्स संक्रमित रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी केला गेला होता. मंगळवारी या रुग्णालयातील सर्व रूग्णांची तब्येत बरी झाल्याने त्यांना सोडण्यात आले आणि बुधवारपासून रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही टेम्पररी रुग्णालये शहराच्या उत्तरेकडील भागात आहेत, ज्यात महामारीसाठी स्क्रीनिंगपासून अनेक सुविधा उपलब्ध होत्या.

बीजिंगमध्ये संसर्गाची ५९३ प्रकरणं होती त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ५३६ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले. चीनमध्ये या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची एकूण संख्या ४,६३३ आहे. दरम्यान देशाच्या आरोग्य आयोगाने सांगितले की, मंगळवारी कोविड-१९ ची ६ नवीन प्रकरणे समोर आली, त्यापैकी ३ इम्पोर्टेड आहेत म्हणजे इतर देशातील आहेत.