हे तर मोदींच्या झुला डिप्लोमसीचे अपयश : असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघात प्रस्ताव केला. परंतु तो फेटाळण्यात आला. फ्रान्सने देखील याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता. परंतु चीनने मात्र आपल्या व्हेटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळला.  या प्रकरणावरुन हैदराबादचे खासदार व एआयएमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टिका करत त्यांच्या झुला डिप्लोमसीचे हे अपयश असून,तेच यास जबाबदार आहेत. अशी टिका ओवेसीनीं केली.

ओवेसी म्हणाले की,चीन या शत्रू देशाला ६३० कोटींची बुलेट प्रुफ जॅकेट खरेदी करण्याची ऑर्डर मोदी सरकारने दिली आहे. असे असतानां देखील भारताने संयुक्त राष्ट्र संघात मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्याच्या पाठवलेल्या प्रस्तावाला चीनकडून विरोध होत आहे. त्‍यामुळे मोदी सरकारने या गोष्‍टीचा विचार करणे गरजेचे आहे.असे ओवेसी म्‍हटले आहे.

दहा वर्षात चार वेळा भारताने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात सादर केला होता. मात्र दरवेळी चीनकडून या प्रस्तावाला पाठींबा न दिल्यामुळे, चीन विषयीच्या भारताच्या धोरणाचा विचार करावा लागेल असे ही, असदुद्दीन ओवेसी म्हणाले. मोदी सरकारने सुरु केलेल्या मुद्रा योजनेचा फायदा किती भारतीय लोकांना मिळाला. याची खरी आकडेवारी मोदी सरकारने जाहीर करावी.असे थेट आवाहन ही ओवेसी यांनी केले.

चीनकडून प्रत्येकवेळी मसूद अजहरच्या बाबतीत मध्येच अडचण निर्माण होत असतांना, फक्त चीनलाच कोट्‍यवधी रूपयांच्या बुलेट फ्रुप जॅकेटची ऑर्डर का देण्यात आली. दुसर्‍या देशाला का दिली गेली नाही ? असा थेट सवालही ओवेसी यांनी बोलतांना केला. देशाला या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्‍यावे असे त्यांनी म्‍हटले आहे. तसेच मोदींच्या झुला डिप्लोमसीचे हे अपयश असल्‍याचं सांगत त्‍यांच्यावर त्यांनी टीका केली.

ह्याहि बातम्या वाचा –

वंचित आघाडीसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

निवृत्त IAS आधिकऱ्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा

शिवसेनेच्या अर्जून खोतकरांबद्दल कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू विरोधात हुंडा आणि लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

दानशूरता ! समाजसेवेसाठी अझीम प्रेमजी यांचं 1,45,000 कोटींचं दान, बिल गेट्सलाही टाकले मागे