काय सांगता ! होय, चीनने भारतात वसवलंय गाव, सॅटेलाईट फोटो आले समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाद सुरु आहे. या दोन्ही देशातील वाढत्या तणावामुळे दक्षिण आशियामध्ये चिंतेचे वातावरण आहे. असे असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुणाचलमध्ये चीनने चक्क एक गाव वसवले आहे. या गावात जवळपास 101 घर असून 1 नोव्हेंबर 2020 रोजी हे फोटो काढले आहेत. सॅटोलाईटद्वारे काढलेले फोटो नुकतेच समोर आले आहेत. भारताच्या प्रत्यक्ष सीमारेषेपासून तब्बल 4.5 किलोमीटर अंतर आत हे गाव आहे

अरुणाचल प्रदेशमामधील त्सारी हे गाव (जि. सुबनशिरी) चू नदीच्या काठावर आहे. या भागावरून दोन्ही देशांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र युद्धाची जागा म्हणून मार्क केली आहे. हिमालायच्या पूर्वेकडील रांगेत असलेल हे गाव दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या काळातच वसवले आहे. नुकतेच दोन फोटो समोर आले आहेत. यातील एक फोटो 26 ऑगस्ट 2019 चा तर दुसरा फोटो 1 नोव्हेंबर 2020 चा आहे. यात पहिल्या फोटोत काही बांधकाम दिसत नाही. मात्र गेल्या वर्षी काढलेल्या फोटोत अनेक घरे दिसून येतात. परराष्ट्र मंत्रालयाला हे फोटो पाठवले होते. याबाबत माहिती विचारली असता त्यावर सांगितले गेले की, चीनकडून भारतात सीमाभागात बांधकाम केल्याची माहिती मिळत आहे. चीनने गेल्या काही वर्षात बांधकामाच्या हालचाली केल्या आहेत. सीमेवर इन्फ्रास्ट्रक्चर चांगले उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत असेही सांगण्यात आले आहे. सरकार रोड, पुल यांसह इतर इन्फ्रास्ट्रक्चरला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये सीमेवर स्थानिक जनतेकडून आवश्यक ती मदत मिळाली असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

ऑक्टोबर महिन्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, काही काळापासून भारत सीमेवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि लष्करी कारवाया वाढवत आहेत. दोन्ही बाजूला तणाव असण्याचे कारण हेच आहे. चीनने असे आरोप केले असले तरी भारताने मात्र अशा प्रकारचे बांधकाम चीनच्या भागात केलेल नाही.