काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आज बंद खोलीत चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस होऊन गेलेत मात्र इतर देशांनी यामध्ये न पडण्याचाच निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे मात्र आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ३७० कलाम रद्द प्रकरणी चर्चा होणार आहे. याशिवाय हाँगकाँगमध्ये गेल्या १० दिवसांपासून लोकशाहीच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दादेखील संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला जाणार आहे.

काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानं आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानं दहशतवादाचा अजेंडा राबवणं कठीण जाईल असं पाकिस्तानला वाटत आहे त्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा भारताकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला त्यामुळे सुरक्षा परिषदेत काश्मीरवर होऊ घातलेली चर्चा दुर्मिळ घटना मानली जात आहे.

आज होणारी बैठक पूर्ण स्वरुपाची असणार नाही. आजची बैठक बंद खोलीत होईल. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. तर या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप मान्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारतानं आधीपासूनच घेतली आहे. त्यामुळे बंद दाराआड ही चर्चा होणार आहे.  काश्मीरचा मुद्दा अंतर्गत स्वरुपाचा नसल्यानं त्यात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही, यावर भारत ठाम आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –