4 देशांमध्ये परिक्षण, एका फॅक्टरीत 20 कोटी वॅक्सीनचं उत्पादन करणार चीन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीन मोठ्या प्रमाणात कोरोना लसीच्या चाचण्या आणि उत्पादन करण्याची तयारी करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅनसिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबियाशी चर्चा करीत आहे जेणेकरून परदेशात लसीच्या मोठ्या चाचण्या करता येईल. सरकारी आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना संसर्ग खूप कमी झाला आहे. परंतु लसीच्या चाचण्यांसाठी अशा भागातील स्वयंसेवकांना लसीचा डोस द्यावा लागतो जिथे संसर्ग आहे. अशा परिस्थितीत चीन परदेशात लस चाचण्या सुरू करीत आहे.

सध्या अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत ब्राझील कोरोना लसच्या चाचणीसाठी योग्य ठिकाण ठरू शकते. कॅनसिनो बायोलॉजिक्सचे सह-संस्थापक किऊ डोंगझू यांनी परदेशात चाचणीच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे. डोंगझू म्हणाले की, फेज-3 ची चाचणी लवकरच सुरू होईल. यावेळी 40 हजार लोकांना लसीचा डोस देण्याची तयारी सुरू आहे.

कॅनसिनो बायोलॉजिक्सने Ad5-nCov नावाची कोरोना लस विकसित केली आहे. Ad5-nCov ही पहिली लस आहे जिची चाचणी चीनमध्ये मनुष्यांवर केली गेली. कंपनीचे म्हणणे आहे की Ad5-nCov लसच्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणी दरम्यान 508 लोकांना डोस देण्यात आला होता, ज्याचा परिणाम फार चांगला झाला. कॅनसिनो बायोलॉजिक्सने असेही म्हटले आहे की कंपनी चीनमध्ये एक नवीन फॅक्टरी बनवित आहे. 2021 च्या सुरूवातीस या लसीचे उत्पादन येथे सुरू होईल. एका वर्षात या फॅक्टरीतून 10 ते 20 कोटी लसीचे डोस तयार केले जातील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like