चीन ‘लॉन्च’ करणार ‘Cryptocurrency’, भारताचे ‘धोरण’ काय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्चुअल करंसीचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच की काय आता चीन देखील आपली क्रिप्टोकरंसी बाजारात आणणार आहे. एकीकडे भारताने अशा क्रिप्टोकरंसीवर रोख लावली आहे, तर दुसरीकडे चीन मात्र अशीच क्रिप्टोकरंसी लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे. peoples bank of china या चीन बँकेच्या एका उच्चाधिकाऱ्याने माहिती दिली की, बँक लवकर आपली क्रिप्टोकरंसी लॉन्च करणार आहे. POBC च्या पेमेंट डिपार्टमेंटच्या डिप्टी डायरेक्टर मू चांगचुुन यांनी सांगतिले की बँकेचे संशोधक मागील १ वर्षापासून क्रिप्टोकरंसीची प्रणाली विकासित करण्यावर भर देत आहे आणि लवकर ही कंरन्सी लॉन्च करण्यात येणार आहे.

बँकेचा मानस आहे की कॅश सर्कुलेशनला रिप्लेस करायचे आहे आणि मॉनिटरी पॉलिसीला नियंत्रित करायचे आहे. यामुळे चीनी चलन युआनला सर्कुलेशन आणि आंतरराष्ट्रीय करणाना आधार मिळेल.

काय आहे भारताची नीति –
परंतू भारताचे चित्र मात्र वेगळे आहे. आर्थिक प्रकरणात पूर्व सचिव सुभाष गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या पॅनलने खासगी क्रिप्टोकरंसी वर बॅन आणला आहे. या पॅनलने यासंबंधित व्यवहारावर २५ कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय या प्रकरणात १० वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय या पॅनलने सेंट्रल डिजिटल चलन आणण्याचा विचारांचा देखील प्रस्ताव मांडला आहे. समितीचे म्हणणे आहे की यामुळे क्रिप्टोकरंसी सारख्या व्यवहारांवर बंदी आणता येईल. याशिवाय या चलनाचा भारताच्या फायनेंशिअल आणि नॉन फायनेंशिअल क्षेत्रात उपयोग करण्यात येईल. आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की चीनच्या या वर्चुअल करंसी नंतर भारत आपल्या डिजिटल चलनाबाबत काय पाऊल उचलणार हे पाहणे आवश्यक ठरेल.

आरोग्यविषयक वृत्त