‘अग्नि-5’ मिसाईलमुळे चीन भयभीत पण ‘ड्रॅगन’च्या ‘मिसाईल’च्या निशाण्यावर कोण ?

बीजिंग : वृत्तसंस्था – भारत आणि चीन या दोन्ही देशांतील संबंध गेल्या काही महिन्यांपासून तणावात आहेत. त्यातच भारताच्या ‘अग्नि-5’ या क्षेपणास्त्रामुळे चीन भयभीत झाला आहे. मात्र, चीनच्या ‘एँटी डिफेन्स मिसाईल’च्या निशाण्यावर कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.

चीनने तीन दिवसांपूर्वी ‘एँटी डिफेन्स मिसाईल’चे (क्षेपणास्त्र) परीक्षण केले होते. मात्र, बीजिंगने या मिसाईलबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. त्यावेळी चीनच्या सुरक्षा विभागाने सांगितले, की या परीक्षणाचा उद्देश कोणत्याही देशाला निशाणा बनविणे नाही. मात्र, चीनी सैन्याच्या एका जवळच्या सूत्रांनी सांगितले, की मिसाईल परीक्षणाचे लक्ष्य भारतच आहे.

तसेच चीनचे एँटी डिफेन्स मिसाईल भारताच्या अग्नि-5 साठी पर्यायी म्हणून आणले जात आहे. भारताच्या अग्नि-5 मिसाईलमध्ये पूर्ण चीनला लक्ष्य करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारताची अग्नि-5 मिसाईल चीनसाठी चिंतेचा विषय आहे.

अशी आहेत अग्नि-5 मिसाईलची वैशिष्ट्ये –
– ही मिसाईल अत्यंत शक्तिशाली असून, 5000 किमीपर्यंत मारक क्षमता यामध्ये आहे. हे मिसाईल भारताच्या दूर अंतरापर्यंत मारक क्षमता असणाऱ्या मिसाईलपैकी एक आहे.

– या मिसाईलमध्ये दीड टन परमाणू हत्यार घेण्याची क्षमता आहे. त्याच्या वेगाचा आवाज 24 पटींनी जास्त आहे.

– अग्नि-5 मिसाईलचे पहिले परीक्षण 19 एप्रिल, 2012 मध्ये केले होते. त्यानंतर दुसरे परीक्षण 15 सप्टेंबर, 2013 मध्ये केले.

चीनची एँटी डिफेन्स मिसाईल
दक्षिण चीन समुद्र आणि भारतासह सीमेवर तणावादरम्यान चीनकडून पुन्हा एकदा आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मिसाईलच्या माध्यमातून मध्यम अंतरावरील मिसाईल रस्त्यातच उद्धवस्त करण्याची क्षमता यामध्ये आहे.