Coronavirus : लवकरच येणार ‘कोरोना’वरील लस ? चीनची तिसऱ्या लससाठी क्लिनिकल चाचणीस मंजूरी

बीजिंग : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूवर लस बनवण्यासाठी जगभरात वेगाने काम केले जात आहे. यामध्ये चीनने पुढाकार घेतलेला दिसत आहे. चीनने आपल्या तिसऱ्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीस मान्यता दिली आहे. चीनने कोरोना व्हायरसच्या तीन लसीच्या क्लिनिकल चाचणीला मान्यता दिली आहे. त्यापैकी एक चिनी पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) विकसित केली आहे.

दरम्यान, चीनमधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जवजवळ कमी झाला आहे. चीनमध्ये कोरोनाचे खूपच कमी प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, कोरोनाच्या कोणत्याही औषधाचा शोध अद्याप लागलेला नाही. म्हणूनच या साथीचे संकट चीनसह जगभरातून टळलेले नाही. तज्ज्ञांच्या मते पुन्हा एकदा कोरोना विषाणू थैमान घालू शकतो. अशा परिस्थितीत कोरोनाला थोपवण्यासाठी लस हेच एकमेव माध्यम आहे, जे जगभरातील शास्त्र शोधण्यात गुंतले आहेत.

चीनमध्ये कोरोनाचे 12 नवीन प्रकरणे समोर आल्याने संक्रमण झालेल्यांची एकूण संख्या 82816 पर्यंत वाढली आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्टने चायना नॅशनल फर्मास्युटिकल ग्रुप आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी अंतर्गत विकसित केलेल्या लसीची क्लिनिकल चाचणी सुरु केली आहे.

चीनची औषध कंपनी सिनोफर्मने सांगितले की, क्लिनिकल चाचणीच्या पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलपर्यंत तीन वेगवेगळ्या वयोगटातील एकूण 96 लोकांना ही लस देण्यात आली. आतापर्यंत या लसचा परिणाम समाधानकरक आहे. तसेच ज्या लोकांना लस देण्यात आली आहे त्या लोकांना देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

कोरोनाच्या विषाणूवर लस तयार करण्यासाठी भारत, चीन आणि अमेरिकेसह इतर देश देखील काम करत आहेत. परंतु ही लस तयार करण्यासाठी जास्त वेळ लगात आहे. यावेळी कोरोना विषाणूमुळे कोट्यावधी लोकांना संसर्ग झाला आहे. जगभरात 1.8 लाख पेक्षा अधिक जाणाचा मृत्यू झाला आहे. जर कोरोनावर लवकरात लवकर औषध किंवा लस उपलब्ध झाली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.