चीननं पुन्हा केलं आश्चर्यचकित, मीडिया वर्ल्डमध्ये केला धमाका, आता 3D न्यूज अँकरला केलं लॉन्च, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन वेगवेगळ्या गोष्टी करून जगाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेत असतो. आतापर्यंत चीनने दिलेल्या कोरोना विषाणूमुळे जग त्रस्त आहे. लाखो लोक संक्रमित आहेत आणि इतके मृत्यू झाले आहेत, या दरम्यान चीनने तंत्रज्ञानाच्या दुनियेत आणखी एक धक्कादायक काम केले आहे. चीनने जगातील पहिल्या थ्रीडी न्यूज अँकरला लाँच केले आहे.

ही बातमी चीनची अधिकृत वृत्तसंस्था सिन्हुआने दिली आहे. सिन्हुआ आणि आणखी एका एजन्सीने मिळून या 3डी अँकरला लाँच केले आहे, याचा व्हिडिओ देखील त्याच एजन्सीच्या ट्वीटर हँडलवरून ट्विट केला गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चीनने हे काम केले असल्याचे या एजन्सीचे म्हणणे आहे. यासोबतच चीनला थ्रीडी तंत्रज्ञानाने चालणाऱ्या पहिल्या न्यूज अँकरला विकसित करण्यात यश आले आहे.

https://twitter.com/Sogou_Inc/status/1263385515862065152

3डी न्यूज अँकर
चीनच्या सरकारी एजन्सी सिन्हुआने सांगितले की, ही थ्रीडी न्यूज अँकर सहजतेने फिरू शकते, त्याचप्रमाणे जशी बातमी आहे, त्याप्रमाणे ती आपल्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू शकते. ती आपले केस आणि ड्रेस देखील बदलू शकते. आत्ताच एक व्हिडिओ चाचणी म्हणून तिला बातमी वाचताना आणि इतर अनेक ठिकाणी दाखवला गेला आहे. येत्या काळात ही थ्रीडी न्यूज अँकर अशाच प्रकारे वाहिन्यांवर बातम्या वाचताना दिसू शकते.

आवाजाचीही नक्कल करणार
सध्या ही अँकर एका महिलेच्या आवाजातच बातमी वाचेल, पण माणसाच्या आवाजाची नक्कल करता येईल असे एक खास वैशिष्ट्य त्यात समाविष्ट केले आहे. ती समोरच्या व्यक्तीच्या आवाजाची नक्कल देखील करू शकते.

२०१८ मध्येही लाँच केली होती डिजिटल अँकर
चीनने अँकर लाँच करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी २०१८ मध्ये सिन्हुआ क्यू हाउ नावाच्या डिजिटल अँकरला न्यूज जगतात लाँच केले आहे. या डिजिटल अँकरला मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे आवाजाची नक्कल करण्यासाठी डिझाइन केले गेले होते. थ्रीडी अँकर तयार करणाऱ्या एजन्सीचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत अशी अँकर स्टुडिओच्या बाहेरही बातम्या वाचताना दिसून येईल. सध्या काही प्रमुख वाहिन्यांचे ज्येष्ठ अँकर स्टुडिओच्या बाहेर अँकरिंग करताना दिसून येतात, पण येणाऱ्या काळात त्यांचाही उपयोग केला जाईल.

रात्रभर वाहिन्यांवर दिसणार बुलेटिन
थ्रीडी न्यूज अँकर बाजारात दाखल झाल्यानंतर टेलिव्हिजन जगात कदाचित रात्रभर बातम्या दिसत राहतील. या अँकरना रात्रीच्या वेळी बातम्या वाचण्यासाठी स्टुडिओमध्ये ठेवले जाईल. तेथून ते बुलेटिन वाचतील. दिवसा अँकर बातम्या वाचतील आणि रात्रीच्या वेळी ही 3डी अँकर दिसत राहील.