Coronavirus : चीनच्या ‘सी-फूड’ मार्केटवर संयुक्त राष्ट्राने कारवाई करावी – ऑस्ट्रेलिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्राणघातक कोरोना विषाणूचे कारण बनलेल्या चीनच्या सीफूड बाजाराविरूद्ध जगाचा राग वाढत चालला आहे. याची सुरुवात ऑस्ट्रेलियापासून सुरु झाली आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी डब्ल्यूएचओ आणि संयुक्त राष्ट्राला या चीनी बाजारावर कारवाई करण्याचे आवाहन केले.

वुहानच्या सीफूड मार्केटमध्ये विकल्या जाणार्‍या वटवाघुळामुळे पसरला होता हा विषाणू
दरम्यान, वुहानच्या सीफूड बाजारात विकल्या जाणार्‍या वटवाघुळाद्वारे हा विषाणू माणसांत पसरला. गुरुवारी एका मुलाखतीत मॉरिसन म्हणाले की, चीनची सीफूड बाजारपेठ ही मोठी समस्या आहे. व्हायरसची उत्पत्ती चीनमध्ये झाली आणि आता ती जगभर पसरली आहे. लोकांचे आरोग्य पाहता जागतिक आरोग्य संघटनेने त्याबद्दल काहीतरी केले पाहिजे. शुक्रवारी झालेल्या मीडिया ब्रीफिंग दरम्यान मॉरिसन यांनी अशा बाजारावर कारवाई करण्याविषयीही बोलले. ते म्हणाले, ‘मला वाटते की हे जगासाठी एक मोठे आव्हान आहे. आरोग्यास होणारा गंभीर धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

साथीच्या रोगासंदर्भात संयुक्त राष्ट्राकडून प्रस्ताव मंजूर
कोरोनाशी लढा देण्यासाठी भारत आणि १८८ देशांचा पाठिंबा देणार्‍या ठरावाला संयुक्त राष्ट्र महासभेने एकमताने मंजुरी दिली. त्यात कोरोना विषाणूचे निर्मूलन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य तीव्र करण्याचा प्रस्ताव आहे. या प्राणघातक विषाणूमुळे ‘समाज आणि अर्थव्यवस्था गंभीर धोक्यात असल्याचे म्हंटले जात आहे.

‘कोविड -१९च्या विरोधातील लढाईत जागतिक एकता’
‘कोविड -१९ च्या विरोधातील लढाईत जागतिक एकता’ असे या प्रस्तावाचे नाव आहे. या जागतिक साथीवर संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेले हे पहिले दस्तऐवज आहे. विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या जगभरात १० लाखांपर्यंत पोहोचली आहे, परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने अद्याप साथीच्या रोगावर चर्चा केली नाही. या दस्तऐवजात समाजात कोरोना विषाणूचे दुष्परिणाम आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त जागतिक प्रवास आणि व्यवसाय आणि लोकांच्या रोजीरोटीच्या जोखमीचा समावेश केला जाईल.