Corona Virus : चीनमध्ये ‘कोरोना’ व्हायरसमुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा 1100 च्या पुढं

बिजिंग : वृत्त संस्था  – चीनमध्ये कोरोना व्हायरसने मरणार्‍यांची संख्या आता 11 हजारच्या पुढे गेली आहे. तर संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1,113 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 44 हजार पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव ट्रेडोस एडरेनोम गॅबरेयेसस यांनी म्हटले की, डब्ल्यूएचओची अंतरराष्ट्रीय टीम अन्य सहकार्‍यांसोबत मिळून चीनमध्ये कोरोना व्हायरसशी लढत आहे.

कोरोना व्हायरसला आता कोविड 19 (Covid 19) नाव देण्यात आले आहे. कोविड 19 कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगात 44,833 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 1113 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविड 19 कोरोना व्हायरसमुळे केवळ चीनमध्ये 44,318 लोक आजारी आहेत तर, 1113 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोविड 19 अजून थांबलेला नाही. हा अजूनही पसरत आहे. मंगळवारी केवळ चीनमध्ये 108 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा पहिला दिवस होता ज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 100 पेक्षा जास्त मृत्यू झाले.

चीनमधील सर्वात मोठे संसर्गजन्य आजाराचे विशेषतज्ज्ञ झॉन्ग नॅनशॅन यांनी म्हटले की, कोविड 19 कोरोना व्हायरस या महिन्यात आणखी पसरेल. हा आणखी जीवघेणा होईल. आनंदाची गोष्ट ही आहे की, कोविड 19 मुळे होणार्‍या संसर्गाचा दर कमी होत आहे. परंतु अजून मरणारांची संख्या कमी झालेली नाही. हा आकडा रोज वाढत आहे.

झॉन्ग नॅनशॅन यांनी सांगितले, कोविड 19 मुळे आतपार्यंत 44,833 लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 1113 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4,657 लोक या आजारातून बरे झाले आहेत. म्हणजे पूर्णपणे ठिक झाले आहेत.