Coronavirus : चीनमध्ये ‘कोरोना’चा ‘हाहाकार’ ! मृतांचा आकडा 3000 च्या घरात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसने चांगलेच थैमान घातले आहे. ८०,५५२ हजार लोकांना या रोगाची लागण झाली आहे आणि ३,०४२ नागरिकांचा बळी गेला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य संघटनेने सांगितलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये गुरुवारी १४३ जणांना संसर्ग झाला असून, त्यातील ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २९ जणांचा मृत्यू हा हुबेई प्रांतात झाला आहे.

राष्ट्रीय आरोग्य संघटनेने सांगितलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये ८०,५५२ नागरिकांना या रोगाचा संसर्ग झाला आहे आणि त्यात ३,०४२ जणांचा मृत्यू झाला आहे. २३,७८४ लोकांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या १६ केसेस समोर आल्या आहेत. त्यातील ११ केसेस ह्या केस गांसू प्रांत येथील तर, ४ बीजिंग आणि १ शांघाय मधील आहेत. हॉंगकॉंगमध्ये १०४ जणांपैकी २ लोकांचा मृत्यू झाला आहे.

४४ लोकांना संसर्ग झाल्याची घटना तैवानमध्ये समोर आली आहे. त्यातील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी चीनमधील हुबेई प्रांतातील १२६ केसेस समोर आल्या असून, २९ लोकांचा बळी गेला आहे. चीनमध्ये सुरुवात झालेल्या या कोरोना व्हायरसने आता भारतात प्रवेश केला आहे.