काय सांगता ! होय, चीनमध्ये 5000 अस्थी कलशची डिलेव्हरी, काय मृत्यूच्या संख्येबाबत खोटं सांगितलं !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसमुळे जगातील मोठेमोठ्या देशांची परिस्थितीही खराब होत असून यादरम्यान आता चीनमधील वुहान येथील स्मशानभूमीत हजारो अस्थी कलश पोहोचल्याचे समोर येत आहे. कोरोना व्हायरसबाबत जग पहिल्यापासूनच चीनवर प्रश्न उपस्थित करत असून आता चीन मृतांचा आकडाही खोटा सांगत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चीन समाजातही मृतदेह जाळण्याची परंपरा आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, चीनमध्ये कोरोना व्हायसरमुळे मरणाऱ्यांच्या अधिकृत संख्येवर संशय व्यक्त केला जात आहे. चीनच्या सोशल मीडियावर अस्थी कलश घेऊन जाणाऱ्या कुटुंबाची छायाचित्रे शेअर केली जात आहेत. चीनच्या स्थानिक माध्यमांनी वुहानच्या एका स्मशानभूमीत दोन दिवसांत ५ हजार अस्थी कलश वितरित केल्याचे समजले आहे. पण किती कलशमध्ये राख भरली आहे हे स्पष्ट झालेले नाही.

चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसने मरणाऱ्यांची संख्या ३००० सांगितली जात आहे. पण जगभरात वाढत्या मृत्यांच्या संख्येसोबतच चीनच्या पारदर्शकतेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वुहानमधील स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून ते म्हणतात की, किती कलश भरले हे त्यांना माहित नाही.

याच महिन्यात चीनने आपल्या देशात कोरोना व्हायरसवर विजय मिळवल्याची घोषणा केली होती. कोरोना व्हायरसमुळे सर्वात जास्त प्रभावित असलेल्या वुहानमधील लॉकडाऊनही चीनने काढून टाकले आहे. चीनने म्हटले की, त्यांच्या देशात आता जास्त प्रकरणे बाहेरील देशातून येणाऱ्या लोकांची आहेत.