‘कोरोना’बाबत मोठा ‘खुलासा’ करणार होता ‘हा’ संशोधक, गोळ्याझाडून केली हत्या

बीजिंग :  वृत्तसंस्था –   चीनमधील एका संशोधकाने दावा केला होता की त्याने कोरोना व्हायरस संदर्भात खूप मोठे संशोधन केले आहे. त्यानंतर काही वेळातच त्याचा संशयास्पद परिस्थितीत हत्या करण्यात आली. त्याची हत्या करण्याचा हेतू काय होता, हे अद्याप पोलिसांना समजू शकले नाही. यानंतर मारेकऱ्याने स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिनमध्ये घडली आहे.

चीनमधील त्या संशोधकाचे नाव डॉ. बिंग लिऊ असे सांगितले जात आहे. बिंग लिऊ पिट्सबर्ग मेडिकल सेंटर विद्यापीठात कार्यरत होते. 37 वर्षीय डॉक्टर बिंग लिऊ हे रॉस टाऊनशिपमधील एका अपार्टमेंटमध्ये एकटेच रहात होते. शनिवारी दुपारी एका व्यक्तीने त्याच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. या व्यक्तीचे नाव हाओ गु असल्याचे सांगण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार हाओ गु याने डॉ. बिंग लिऊ यांच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यामध्ये लिऊ यांच्या डोकं, मान आणि शरिराच्या इतर भागाला गोळ्या लागल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पिट्सबर्गच्या पोस्टनुसार, घटनेच्यावेळी डॉ. लिऊ यांची पत्नी घरामध्ये नव्हती. या दोघांना मुलबाळ नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर हाओ गु हा आपल्या करकडे आला आणि त्यानंतर त्याने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. लिऊ आणि गु एकमेकांना आधिपासूनच ओळखत होते असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांचे एकमेकांसोबत कसे सबंध होते याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. डॉ. लिऊ यांच्या हत्येमागे काय हेतू होता याचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. लिऊ यांच्या घरातून कोणतीही वस्तू गायब झालेली नाही. आपल्या जीवाला धोका आहे हे डॉ. लिऊ यांना ठाऊक नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

डॉ. लिऊ पिट्सबर्ग मेडिकल सेंटर विद्यापीठात संशोधक सहाय्यक म्हणून कार्यरत होते. यूपीएमसीने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यूपीएमसीच्या वतीने सांगण्यात आले की, ते कोरोनासंबंधीच्या एका संशोधनाच्या अगदी जवळ पोहचले होते. ते कोरोना संक्रमणाच्या सेल्युलर यंत्रणेवर संशोधन करित होते. यूपीएमसीच्या वतीने असेही सांगण्यात आले की, आता ते लियूचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. डॉ. लिऊ यांनी सिंगापूर येथून संगणक विज्ञान विषयात पिएचडी केली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध कार्नेगी मलॉन युनिव्हर्सिटी पिट्सबर्ग येतून पोस्टडॉक्टोरलचा अभ्यास केला.