पहिल्या ‘कोरोना’ वॅक्सीनची 100 लोकांवर ट्रायल पूर्ण, जाणून घ्या काय आला ‘रिझल्ट’

नवी दिल्ली : चीनमध्ये बनवण्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनबाबात अपेक्षा वाढविणारे वृत्त आहे. सुमारे 108 लोकांवर या वॅक्सीनची ट्रायल घेण्यात आली होती. ट्रायलदरम्यान समजले की, ही वॅक्सीन व्हायरसविरोधात इम्यून रिस्पॉन्स निर्माण करत आहे.

चीनी वॅक्सीनचा ट्रायल रिपोर्ट मेडिकल जनरल द लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, संशोधकांनी अनेक लॅबमध्ये या वॅक्सीनवर अभ्यास केला.

चीनची ही एडी5 लस कॅनसीनो कंपनीने तयार केली आहे. ही लस ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि अमेरिकन कंपनी मॉडर्नाच्या लसीच्या पुढे असल्याचा दावा चीन करत आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच या लशीची मानवावर ट्रायल सुरू झाली होती.

परंतु, चीनी वॅक्सीनचे काही साईड इफेक्ट्ससुद्धा दिसून येत आहेत, जसे की वेदना आणि ताप. परंतु हे एक महिन्याच्या आत दूर होतात. या लशीमुळे कोणताही गंभीर धोका निर्माण झालेला नाही.

संशोधनात आढळले की, ही लस दिल्यानंतर सुमारे 28 दिवसानंतर व्यक्तीच्या शरीरात इम्यून रेस्पॉन्स सर्वात जास्त होता. जगभरात सध्या विविध देशांमध्ये वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या सुमारे 100 टीम कोरोनावरील वॅक्सीनवर संशोधन करत आहेत.

फिजर, बायो एन टेक, कॅनसीओ सारख्या कंपन्यानी कोरोना वॅक्सीनच्या मानवी ट्रायल सुरू केल्या आहेत. अमेरिकन आरोग्य आणि मानवी सेवा विभागाने गुरूवारी म्हटले की, ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीची वॅक्सीन तयार करण्यासाठी औषध कंपनी अ‍ॅस्ट्रा झेनेका ला 1.2 बिलियन डॉलरपर्यंत रक्कम दिली जाईल.

सोमवारी अमेरिकन कंपनी मॉडर्नाने कोरोना वॅक्सीनच्या पहिल्या राऊंडची माहिती दिली होती. पहिल्या राऊंडमध्ये केवळ आठ लोकांना वॅक्सीन दिली होती. कंपनीने म्हटले होते की, वॅक्सीन सुरक्षित वाटत आहे आणि इम्यून रेस्पॉन्स निर्माण करत आहे. बुधवारी बोस्टनच्या संशोधकांनी म्हटले की, वॅक्सीन प्रोटोटाईपने माकडांना कोरोना संक्रमित होण्यापासून वाचवले.