चीन करू शकतं भारतावर ‘जैविक’ हल्ला, गुप्तचर यंत्रणांनी केलं सावध

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व लडाखजवळील सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसाचार झाला. त्यात भारताचे २० सैनिक शहिद झाले होते. त्यानंतर आता चीन भारतावर जैविक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना संसर्गाबाबत जगभरात चीनची भूमिका संशयास्पद राहिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावाखाली असलेला चीन इतर भारतविरोधी असलेल्या देशांकडून अथवा दहशतवाद्यांमार्फत जैविक हल्ला करु शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

चीन आणि पाकिस्तान या शेजारील देशांच्या भूमिकेमुळे भारत त्रस्त आहे. तर मुत्सद्दी आणि सैनिक घेरावामुळे चीन संतापला आहे. सीमेवरही पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. नेपाळची वृत्ती देखील अलीकडे चांगली राहिली नाही. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून चीन जैविक हल्ल्यासारखे कृत्य करू शकतो. काही दिवसांपूर्वीच लष्कराने दहशतवाद्यांसाठी शस्त्रे बाळगणारे ड्रोन पाडले. ड्रोनद्वारे जैविक हल्ला देखील शक्य आहे. अशा हल्ल्याची तीव्रता सुरुवातीस जाणवत नाही. हल्ला सुद्धा काही काळानंतर आढळून येतो आणि नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.

ग्वाल्हेर येथील डीआरडीईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, भारतीय लष्कर अशा प्रकारच्या धमक्यांना तोंड देण्यासाठी तयार आहे. डीआरडीओच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांची विभक्त रासायनिक जैविक युद्धविधान सूट, विशेष मास्क आधी सारखी विशेष उपकरणे तयार केली आहेत. यासाठी जवानांना वेळोवेळी विशेष प्रशिक्षण देखील दिलं जात. हल्ल्यावेळी, प्रथम कोणत्या प्रकारचा विषाणू हल्ला करतात, हे शोधलं जातं. त्यानंतर, त्यास तटस्थ करण्यावर भर दिला जातो. मग ते नष्ट केले जातात. या प्रक्रियेसाठी विशेष केमिकल ‘एजंट मॉनिटर्स’ डीआरडीओनं बनवलं आहे.