cyber fraud | चीनमध्ये बसलेले ठग भारतीयांना लावत आहेत ऑनलाइन चूना, दारू-मसाल्यांमध्ये गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांना फसवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीन (chaina) कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीयांचे नुकसान करण्यासाठी सतत सक्रिय आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) साऊथ ईस्ट जिल्हा पोलिसांनी एका अशाच गँगचा पर्दाफाश (cyber fraud) केला आहे, जे भारतीय लोकांना दारू आणि मसाल्यात गुंतवणुकीच्या नावावर फसवत होते. china cyber fraud thugs cheating indians crores of rupees cheated in the name of investment in liquor spices

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

रक्कम चीनी अ‍ॅपद्वारे (Chinese app) इन्व्हेस्ट केली जात होती, जी पुन्हा मिळत नव्हती.
या प्रकरणात दोन तरूणांना अटक केली आहे.
हैद्राबाद येथील रहिवाशी नागाराजू कर्मांची (31) आणि सिकंदराबाद, तेलंगना येथील रहिवाशी कोनडाला सुभाष (31) अशी आरोपींची नावे आहेत.
हे दोघे चीनमध्ये बसलेल्या लोकांसाठी काम करत होते.

बँकेत उघडत असत खाते

दोन्ही आरोपी चीनी नागरिकांसाठी एक नवीन कंपनी रजिस्टर करत असत, ज्यामध्ये भारतीय नागरिकांना डायरेक्टर नियुक्त करत असत.
नंतर कंपनीच्या नावावर भारतीय बँकांमध्ये खाते उघडत असत.

ही बँक खाती चीनमधून ऑपरेट केली जात असत.
दिल्ली पोलिसांचा दावा आहे की, या गँगने 45 दिवसांच्या आत कोट्यवधी रूपयांची रक्कम क्रिप्टोकरन्सी आणि हवालाद्वारे चीनला पोहचवली आहे.
या गँगने 2000 पेक्षा जास्त लोकांना फसवले आहे.

साऊथ ईस्ट जिल्ह्याचे डीसीपी आर. पी. मीना (DCP R. P. Mina) यांचे म्हणणे आहे की, बदरपुरमध्ये राहणारा वरुण शर्मा याने गृह मंत्रालयाच्या सायबर पोर्टलवर गुंतवणुकीच्या नावावर 10.38 लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती.
यावरून 19 जूनला बदरपुर पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केले.

ज्यामध्ये पीडित व्यक्तीने म्हटले की, तो डेटिंग अ‍ॅप (Dating app) टिंडरद्वारे सू येओन पार्क नावाच्या एका महिलेच्या संपर्कात आला.
या महिलेने तिची ओळख साऊथ कोरियन नागरिक म्हणून करून दिली आणि फायनान्स अ‍ॅडव्हायजर असल्याचे सांगितले.

तिने वरुणला गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न देण्याचे आमिष दाखवले.
वरुणने 5000 रुपयांची गुंतवणूक केली, ज्याच्या बदल्यात त्याला चांगले रिटर्न मिळाले.
यानंतर त्याने चार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एकुण 10 लाख 38 हजार रुपये गुंतवले.

जेव्हा तो रक्कम काढण्यासाठी गेला तेव्हा त्याला आणखी एका स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. रक्कम काढता येत नसल्याने तो समजला की त्याला फसवण्यात आले आहे.

आरोपींना अटक केले

इन्स्पेक्टर पवार यांच्या टीमने एक जुलैला सिकंदराबाद, तेलंगणा येथील रहिवासी कोनडाला सुभाषला सेक्टर-23 गुरुग्राममधून अटक केली.
तो गोल्डन मार्क टेक्नोलॉजीस नावाच्या कंपनीचा डायरेक्टर होता. यानंतर नागराजू कर्मांची यास अटक केली.

आरोपींनी सांगितले की, ते चीनमध्ये बसलेल्या त्यांच्या टोळीच्या निर्देशावर फसवणुकीचा धंदा करत होते. आरोपी चीनी नागरिक सोशल मीडिया फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिंडरसारख्या वेबसाइट आणि अ‍ॅपवरून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आणि नंतर गुंतवणूक करण्यास सांगत.

Web Title : china cyber fraud thugs cheating indians crores of rupees cheated in the name of investment in liquor spices

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold News | खुशखबर ! 12 जुलैपासून मिळणार स्वस्त सोने, सरकार देईल स्वस्तात खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कोणत्या दराने मिळणार?

Petrol and diesel price today | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान