Coronavirus : ‘कोरोना’मुळं ‘बलात्कार’ होण्यापासून वाचली तरुणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आजपर्यंत ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने चीनसमवेत संपूर्ण जगाला आपल्या ताब्यात घेतले आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात लोक भयभीत झाले आहेत. परंतु चीनमध्ये या विषाणूमुळे एक तरुणी बलात्कार होण्यापासून वाचली आहे.

बलात्कार टाळण्यासाठी मुलीने खोकल्याचे केले नाटक
चीनमधील वुहानमध्ये एका तरुणाने बलात्कार करण्याच्या उद्देशाने एका तरुणीच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्या तरुणाने तरुणीची छेडछाड सुरू केली. या तरुणाच्या हल्ल्यामुळे घाबरून तरुणीने प्रथम स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तिने खोकल्याचे नाटक सुरू केले. तरुणीने आरोपीला सांगितले की तिला कोरोना विषाणूने पीडित आहे.

तरुणीला कोरोना झाला आहे हे ऐकताच आरोपी तरुण घाबरला आणि तेथून पळ काढला. शिओ असे आरोपीचे नाव आहे, त्याचे वय २५ वर्षे आहे. सुरुवातीच्या तपासात समोर आले की आरोपी तरुणीच्या घराचा दरवाजा तोडून आत शिरला. तरुणीने सांगितले की, आरोपीने अचानक माझ्यावर हल्ला केला, त्यानंतर मला दुसरे काहीही सुचले नाही. मी म्हणाले की मला कोरोना विषाणू झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चीनच्या बर्‍याच शहरांमध्ये पसरला आहे. बुधवार पर्यंत या विषाणूच्या संसर्गामुळे ५६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, त्याद्वारे २४ हजाराहून अधिक लोक संक्रमित आहेत.