कोरोना व्हायरस : जीव धोक्यात घालून रूग्णांची मदत करतेय ‘ही’ प्रेग्नंट नर्स, व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ

वुहान : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने सर्वत्र गोंधळ आणि घबराटीचे वातावरण आहे. तेथे रोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. आता तेथील एका व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी चॅनल सीसीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये 9 महीन्यांची एक गरोदर नर्स दिसत आहे, कोरोना व्हायरसने पीडित रूग्णांवर ती उपचार करताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला चीनचा प्रोपेगंडा म्हणत आहेत.

काय आहे या व्हिडिओत ?
चीनच्या सीसीटीव्हीने हा व्हिडिओ मागच्या आठवड्यात जारी केला होता. येथील जहो यू नावाची एक नर्स वुहानच्या मिलिट्री हॉस्पिटलच्या इमरर्जन्सी वार्डमध्ये दिसत आहे. 9 महीन्यांची गरोदर असलेली ही नर्स हॉस्पिटलमधील रूग्णांचा ताप तपासाताना दिसत आहे. व्हिडिओत स्पष्ट ऐकू येत आहे की, रूग्ण त्या नर्सला म्हणत आहे की, तुम्ही येथे काम करू नका, हे खुप धोकादायक आहे. तर व्हिडिओत नर्स म्हणत आहे की, घरातील लोकही गरोदर असल्याने काम करण्यास नकार देत आहेत, परंतु मला लोकांची मदत करायची आहे.

चीनवर टीका
यावरून सोशल मीडियावर लोक चीनवर जोरदार टीका करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, चीनने अशाप्रकारचा प्रोपेगंडा करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. लोक प्रश्न उपस्थित करत आहेत की, अशाप्रकारे कुणी गरोदर नर्सला कामावर घेऊ शकतात का ?

केसांचे मुंडन करणार्‍या नर्स
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये काही नर्स आपले केस काढत असल्याचे दिसत आहे. त्या व्हिडिओत रडताना दिसत आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, रूग्णांची देखभाल करणे सोपे जावे यासाठी नर्सेस आपले केस कापत आहेत. केस कापल्यानंतर नर्सेस बचावासाठी असलेले कपडे आणि किट सहजपणे घालू शकतात. लोक या व्हिडिओवर सुद्धा प्रश्न उपस्थित करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, पूर्ण केस कापण्यापेक्षा महिला छोटे केस पण ठेवू शकतात.