‘कोरोना’च्या संकटादरम्यान देखील ड्रॅगननं केली डिफेन्सच्या बजेटमध्ये वाढ

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाचे संकट गडद होत असतानाही अशा संकटकाळातही चीन संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अधिक जोर देताना दिसत आहे. चीनने डिफेन्स बजेटमध्ये वाढ करून ते 179 अब्ज डॉलर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा चीन हा दुसरा देश आहे.

भारताच्या डिफेन्स बजेटच्या तुलनेत चीनचे डिफेन्स बजेट तिप्पट आहे. गेल्या वर्षी चीनचे डिफेन्स बजेट 177.6 अब्ज डॉलर्स होते. सद्य परिस्थितीत पाहता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चीनने डिफेन्स बजेटमध्ये कमी वाढ केली आहे. कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला बसलेली खिळ बसली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतही वाद सुरू आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकेने चीनलाच जबाबदार धरले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतील वाद हे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत यावेळीही डिफेन्स बजेटमध्ये करण्यात आलेली वाढ महत्त्वाची मानली जात आहे. 2020 मध्ये चीनच्या डिफेन्स बजेटमधील वृद्धी दर हा 6.6 टक्के राहणार आहे. तर 20 लाख जवानांसह चीनचे सैन्य हे जगातिल सर्वात मोठे सैन्य ठरणार आहे. सलग पाचव्या वर्षी चीनने डिफेन्स बजेटमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी वाढ केली आहे. डिफेन्स बजेटच्या मसुद्यानुसार यावर्षी चीनचं डिफेन्स बजेट 1 हजार 270 अब्ज युआन म्हणजेच 179 अब्ज डॉलर्स इतके असणार आहे.