WHO चा खुलासा ! चीननं लपवली होती ‘कोरोना’ व्हायरसची माहिती, 2 आठवडे उशीरा दिली ‘सूचना’

जिनिव्हा : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिकदृष्ट्या कोरोना व्हायरससंबंधीची माहिती ताबडतोब उपलब्ध केल्याचे सांगून जानेवारी महिन्यात चीनचे कौतूक सुरू ठेवले होते. मात्र, कागदपत्रांतून हा खुलासा झाला आहे की, डब्ल्यूएचओ यासाठी चिंतीत होते की नवीन व्हायरसच्या उत्पन्न झालेल्या धोक्याचे आकलन करण्यासाठी चीन योग्य माहिती देत नव्हता आणि जगाचा मौल्यवान वेळ खर्च होत होता. वास्तविक, चीनच्या अनेक प्रयोगशाळांमध्ये या व्हायरसला पूर्णपणे डिकोड केलेले असतानाही चीनी अधिकार्‍यांनी एक आठवड्यापेक्षा अधिक काळापर्यंत घातक व्हायरसचा अनुवंशिक नकाशा, किंवा जीनोम जारी करण्यात उशीर केला होता आणि चाचणी, औषधे तसेच लसीसाठी महिती दिली नव्हती.

सूत्रांच्या महितीनुसार अंगतर्गत कागदपत्र, ईमेल आणि डझनावारी चर्चांचे रेकॉर्डमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे की, चीनच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीत माहिती आणि प्रतिस्पर्धेवर कठोर नियंत्रणाला खुप मोठ्याप्रमाणात दोष देण्यात आला होता. आरोग्य अधिकार्‍यांनी 11 जानेवारीला विषाणू शास्त्राच्या एक वेबसाइटवर एका चीनी प्रयोगशाळेद्वारे याबाबत एक लेख प्रसारित केल्यानंतर व्हायरसच्या जीनोमची माहिती सार्वजनिक केली होती.

विविध अंतर्गत बैठकांच्या रेकॉर्डिंगनुसार, यानंतरही चीनने डब्ल्युएचओला आवश्यक माहिती देण्यात आणखी दोन आठवडे उशीर केला. एका वृत्तसंस्थेला मिळालेल्या रेकार्डिंगनुसार कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या जागतिक प्रसारादरम्यान जागतिक आरोग्य संघटना चीन सरकारच्या या गोष्टीचे यासाठी कौतूक करत राहिली की, नवीन व्हायरसचा अनुवंशिक नकाशा अथवा जीनोमबाबत ताबडतोब माहिती द्यावी.

डब्ल्यूएचओ या गोष्टीसाठी चिंतीत होते की, नव्या व्हायरसमुळे उत्पन्न झालेल्या जोखिमेचे मुल्यांकन करण्यासाठी चीन योग्य माहिती देत नाही आणि जगाचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विभागाचे चीनमधील एक अधिकारी गुआदेन गालेया यांनी चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेलचा उल्लेख करत एका बैठकीत सांगितले की, त्यांनी टीव्हीवर ही माहिती येण्याच्या 15 मिनिटे अगोदर ती आम्हाला दिली आहे. महामारीची सुरूवातीची ही गोष्ट अशावेळी आली आहे, जेव्हा संयुक्त राष्ट्रची ही आरोग्य संस्था संशयाच्या फेर्‍यात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like