Alert ! चीननं भारतात केला सायबर अटॅक, तुमच्याकडे सुद्धा आलाय का ‘हा’ मॅसेज ? बिथरलेल्या चीनचं कृत्य

नवी दिल्ली : भारत-चीन सीमा वादात चीनने भारतात एक सायबर अटॅक केला आहे. सायबर अटॅकबाबत भारताच्या सुरक्षा एजन्सीजने अलर्ट जारी केला आहे. कोरोना महामारीमुळे लोक घाबरलेले आहेत आणि कोरोना टेस्ट करण्यासाठी इच्छूक आहेत. प्रायव्हेट लॅबमध्ये महागड्या दराने होत असलेल्या कोरोना टेस्टमुळे आता लोकांकडे फ्रीमध्ये कोरोना टेस्ट करण्यासाठी मॅसेज येत आहेत. ज्यामध्ये एक लिंक दिली आहे. परंतु, प्रत्यक्षात ही लिंक तुमच्या आर्थिक नुकसानीचे कारण ठरू शकते.

या मॅसेजबाबत सुरक्षा एजन्सीजने अलर्ट जारी केला आहे की, जर तुमच्याकडे अशाप्रकारची लिंक आली तर ओपन करू नका. सुरक्षा एजन्सीजच्या म्हणण्याप्रमाणे हा एक प्रकारचा सायबर अटॅक आहे, जो चीनने केला आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, सायबर एक्सपर्ट पवन दुग्गल यांचे म्हणणे आहे की, भारतात सायबर कायदा कमजोर असल्याने आणि लोकांमध्ये कमी जागृतता असल्याने भारतातील लोक अशाप्रकारच्या अटॅकला जास्त बळी पडतात.

सुरक्षा एजन्सीजचे म्हणणे आहे की, आता सायबर अटॅकचा धोका वाढला आहे. सायबर गुन्हेगार नेहमी संधीची वाट पहात असतात. कोरोना काळात फ्रीमध्ये टेस्ट करण्याचे अमिष देऊन लोकांना फसवले जाऊ शकते. लोकांच्या मोबाईलवर येणारे मॅसेज पाहिल्यानंतर एजन्सीजने इशारा दिला आहे.