Facebook नं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या नावाचा ‘असा’ केला उल्लेख, आता मागतोय माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या म्यानमार दौर्‍याच्या वेळी फेसबुकवर बर्मी भाषेतून त्यांच्या नावाचे चुकीचे भाषांतर केल्याबद्दल फेसबुकने शनिवारी दिलगिरी व्यक्त केली. म्यानमारच्या फेसबुक पेजवरील स्वयंचलित ट्रान्सलेशन सिस्टममध्ये शी जिनपिंग यांच्या नावाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे वाद निर्माण झाला. बर्मीतून इंग्रजीत अनुवादित केलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये शी जिनपिंग यांचे नाव “मिस्टर शिटहोल” असे लिहिले गेले होते. दरम्यान, म्यानमारची राजधानी नैपितावची (Naypyitaw) जिनपिंग यांची दोन दिवसांची भेट ही कोणत्याही चीनच्या नेत्याची दोन दशकातील पहिली भेट आहे.

जिनपिंग चे ‘शिटहोल :
म्यानमारचे नेते आंग सान सू ची यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर सर्वात आधी चूक दिसून आली. यापूर्वी शनिवारी पोस्ट केलेल्या अनुवादित निवेदनात म्हटले आहे की, “चीनचे अध्यक्ष मिस्टर शिटहोल संध्याकाळी चार वाजता आले आहेत.” पुढे असे लिहिले आहे की, “चीनचे अध्यक्ष मिस्टर शिटहोल यांनी प्रतिनिधी सभागृहातील अतिथींच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.”

फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली :
फेसबुकने म्हटले की, हे खेदजनक आहे आणि तांत्रिक त्रुटीमुळे हे घडले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही तांत्रिक त्रुटी ठीक केली आहे. ज्यामध्ये शी जिनपिंग यांच्या नावाचे फेसबुकवर चुकीचे भाषांतर केले गेले.”

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/