चीन : हे आहेत जलपरीचे ‘वंशज’, यांचे कपडे बनतात माशांच्या कातडीनं

बिजिंग : चीनमध्ये एका राज्याच्या छोट्या गावात राहणारा एक समाज माशांच्या चामड्याचे कपडे बनवतो. आता या समाजाचे मोजके लोकच उरले आहेत, ज्यांना माशांच्या चामड्यापासून कापड बनवता येते. या आहेत 68 वर्षीय यू वेनफेंग. चीनच्या हिलोंगजियांग राज्याच्या तोंगजियांक शहराच्या हेझेन गावात या राहतात. यू वेनफेंग हेझेन समाजाच्या आहेत, ज्याचे खुप कमी लोक सध्या आहेत. यांच्या समुदायाच्या काही लोकांना माशाच्या चामड्याचे कपडे बनवता येतात.

यू वेनफेंग सांगतात की, आमच्या समाजाचे अनेक लोक 1930 आणि 1940 च्या दशकात जपानला गेले होते. तेथे मंचूरिया म्हणून काम करू लागले. तसेच हेझेन समाजाचे अनेक लोक मारले गेले, परंतु मेरी येथे चीनमध्ये वाचली. तिनेच मला माशाच्या चामड्यापसून कापड बनविण्यास शिकवले.

या हेझेन समाजाच्या लोकांना चीनमध्ये अमूर म्हटले जाते. तर, रशियाच्या सैबेरियात ब्लॅक ड्रॅगन नदीजवळ राहणार्‍या याच समाजाच्या लोकांना तुंगसिक समाजाशी जोडले जाते.

चीनमध्ये हेझेन समजाने विश्वयुद्ध 2 च्यानंतर आपली लोकसंख्या वाढवली. विश्व युद्ध-2 च्या वेळी हे फक्त 300 लोक होते. जे आता सुमारे 5000 झाले आहेत. अजूनही हे लोक कार्प, पाईक आणि सालमन माशाच्या चामड्याचे कपडे बनवतात.

यू वेनफेंग सांगतात, सध्याच्या पीढीकडून काही लोकांना ही कला शिकायची आहे. माशांच्या चामड्यापासून बनवलेले कपडे आता हेझेन समाजाचे लोक दररोज वापरत नाहीत, कधीतरी काढतात. परंतु, पूर्वी असे नव्हते.

तोंगजियांगमध्ये राहणार्‍या हेझेन समाजाच्या लोकांचा गाव चीनच्या उत्तर-पूर्वमध्ये रशियाच्या सीमेच्या लगत आहे. यू वेनफेंग येथेच लोकांना माशांच्या चामड्यापासून कापड बनवण्यास शिकवते. सोबतच ती हेझेन समाजाच्या आगळ्यावेगळया दंतकथा ऐकवण्याची परंपरा सुद्धा जिवंत ठेवत आहे. या कथा गितांसह सादर केल्या जातात.

माशाच्या चामड्यापासून कापड बनवण्यासाठी गोठलेल्या नदीतून मासे पकडावे लागतात. यू वेनफेंगचे स्वताचे एक बुटीक सुद्धा आहे, जेथे ती आपल्या विद्यार्थ्यांना माशाच्या चामड्यापासून कापड बनविण्यास शिकवते.

हेझेन समाजाचे लाके गोठलेल्या नदीतून मासे पकड्यात एक्सपर्ट असतात. त्यांना मरमेड म्हणजे जलपर्‍यांचे वंशज समजले जाते. यू वेनफेंग सांगतात, जेव्हा जंगलापर्यंत पाणी पोहचते तेव्हा नदीमध्ये भरपूर मासे असतात. तुम्ही भाला फेका, तुम्हाला मासा मिळेल.

वेनफेंग म्हणते, पूर्वी आपल्याला हवे तशा पद्धतीने मासे पकडले जात. आता बाजारातून मागवतो. पूर्वी शिवणकामासाठी टायगर बोन आणि डियर टेंडनचा उपयोग केला जात होता. आता तर बाजारात शिवणकामाची सुई आणि धागे मिळतात. महिलांसाठी एक टॉप आणि ट्राऊझर बनवण्यासाठी 50 आणि पुरूषांसाठी 56 माशांचे चामडे लागते.

बाजारातून मासे आणल्यानंतर त्यांची चामडी काढली जाते. ती सुकवली जाते. नंतर हे चामडे लाकडाच्या प्रेसने आयर्न केले जाते. या पूर्ण प्रकियेसाठी सुमारे एक महीना लागतो. यानंतर शिवणकाम करण्यासाठी 20 दिवस आणखी लागतात.

यू वेनफेंगची इच्छा आहे की, त्यांच्या कपड्यांचे बँड्रिंग व्हावे, जसे की साप आणि मगरीच्या चामड्यापासून बनलेले कापड आणि एक्सेसरीजचे होते. यामुळे त्यांच्या समाजाच्या लोकांना काम आणि पैसे दोन्ही मिळेल.