Coronavirus : चीन नव्हे तर अमेरिकेतून कोरोनाचा फैलाव, ‘ड्रॅगन’चा अमेरिकेवर पलटवार

वॉशिंग्टन/बीजिंग : वृत्त संस्था – सध्या जगभरात कोरोना (Coronavirus ) ने थैमान घातले आहे. जगात कोट्यवधी नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर अनेकांना प्राणदेखील गमवावा लागला आहे. तर, दुसरीकडे जवळपास दीड वर्षानंतरही कोरोना विषाणूचा उगम कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यानंतर आता कोरोना संसर्गाच्या मुद्यावर अमेरिका अन् चीन यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

बँक बुडाली तर बुडणार 4.8 कोटी खात्यांवरील रक्कम, जाणून घ्या तुमचे डिपॉझिट सुरक्षित आहे किंवा नाही

कोरोनाचा संसर्ग चीनमधून नव्हे तर अमेरिकेतून फैलावला असल्याचा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशी करणाऱ्या गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना उगम कसा झाला, याची चौकशी, तपास करण्यासाठी अमेरिकेची नॅशनल लॅब एजन्सी मदत करणार आहेत. कोरोनाबाबतचा तपास करण्यासाठी मदत करण्याचे चीनलाही अमेरिकेने आवाहन केले आहे.

‘वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, अमेरिकेला तथ्य आणि सत्य यांची पर्वाच नाही. त्याशिवाय वैज्ञानिक पद्धतीने कोरोना विषाणूच्या उगमाची माहिती करून घेण्यासही अमेरिकेला फारसा रस नसल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेने फोर्ट डेट्रिक सैन्य तळासह सर्व जैव प्रयोगशाळा चौकशीसाठी खुल्या करण्याची मागणी चीनने केली आहे.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

चीनने ही मागणी करून कोरोनाच्या उगमाच्या मुद्यावर अमेरिकेलाही कोंडीत पकडण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेला खरोखरच संपूर्ण पारदर्शकता हवी असेल तर त्यांनी चीनप्रमाणेच जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनाही अमेरिकेत चौकशीसाठी बोलवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी